• 71f5f42e-4ec9-4eaf-a61a-9cc42e645443

  पंकजा मुंडे यांचा राष्ट्रवादीला झटका

  पंकजा मुंडे यांचा राष्ट्रवादीला झटका

 • post-image-gram-sadak

  राज्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजना नव्याने राबविणार – पंकजा मुंडे

  केंद्राच्या पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या धर्तीवर राज्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजना नव्याने कार्यान्वित करुन संपूर्ण ग्रामीण महाराष्ट्र शहरांना जोडण्याचा महत्वकांक्षी संकल्प आज राज्याच्या ग्रामविकास, जलसंधारण व महिला व बालकल्याण मंत्री पंकजा पालवे-मुंडे यांनी येथे सोडला आहे.

  पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत औरंगाबाद विभागात झालेल्या कामांचा आढावा येथील सुभेदारी विश्रामगृहात संबंधित अधिकाऱ्यांच्या बैठकीत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी घेतला. त्यावेळी त्या बोलत होत्या.

  ग्रामीण भागात दळणवळण सक्षम करण्यासाठी ग्रामीण रस्त्यांची अत्यंत आवश्यकता आहे. मध्यप्रदेशात मुख्यमंत्री ग्रामसडक योजना अत्यंत प्रभावी ठरली आहे. त्याचेच अनुकरण महाराष्ट्रात करण्यात येईल अशी माहिती सांगत या बैठकीत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली. त्या म्हणाल्या की, आणखी एक जलसंधारणासारख्या लोकोपयोगी कार्यक्रम प्रभावीपणे हाती घेण्यात येईल यासाठी कोणत्याही परिस्थितीत राज्यात जून-जुलैमध्ये पडणाऱ्या पावसाचे पाणी जागेवरच अडविले जाईल. छोटे नाले, ओढे, गाव तलाव, लघुतलाव, छोटे बंधारे अशा सर्वच ठिकाणी हा पाणी अडविण्याचा कार्यक्रम केला तरच त्यापुढील वर्षी शेती व पिण्यासाठी पाणी मिळू शकेल. दरवर्षी राज्याला पाणीटंचाई व दुष्काळाला सामोरे जावे लागते. या नव्या जलसंधारण कार्यक्रमामुळे त्यावर उपाय होऊ शकेल.

  औरंगाबाद विभागातील आठ जिल्हयात पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत 76 तालुक्यात 1 ते 12 टप्पे हाती घेऊन 1450 रस्त्यांची कामे पुर्ण करण्यात आली. त्यातून 4886.98 कि.मी. रस्ते बांधकाम पूर्ण करण्यात आले. 192 कामे प्रगतीपथावर आहेत. मार्च 2014 अखेर यामुळे रस्त्याच्या कामावर 1108.36 कोटी रुपये खर्च करण्यात आले, असे अधीक्षक अभियंता एस.एस. जोशी यांनी यावेळी सांगितले.

  जिल्हा परिषदेमार्फत लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या योजना राबविल्या जातात. त्यांचा आढावाही मंत्री पंकजा मुंडे यांनी जाणून घेतला. या योजनेतून ग्रामीण भागात रस्ते, गटारे, समाजभवन व अन्य मूलभुत सूविधा घेण्यात येतात. यावर्षी या योजनेतून 6 कोटी रुपये वितरित करण्यात आल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी यांनी यावेळी सांगितले. या योजनेवर बोलतांना मंत्री मुंडे म्हणाल्या आता यापुढे या योजनेवर निधी वितरीत करण्यावर स्थगिती आहे. राज्यात अद्यापही काही जिल्ह्यात सदरचा निधी वितरित झालेला नाही. आता नवीन लोकप्रतिनिधी निवडून आल्याने उर्वरित मार्च महिन्यापर्यंतच्या कालावधीसाठी निधी वितरणाचा निर्णय घेतला जाईल. औरंगाबाद जिल्ह्यातील पंचायत समितीच्या इमारती बांधकामालाही लागणारा निधी उपलब्ध करुन दिला जाईल.

  विभागस्तरावर औरंगाबाद येथे महिला बचतगटाच्या विक्री व प्रदर्शनाचे 13 ते 19 नोंव्हेबरपर्यंत आयोजन करण्यात येत असल्याची माहिती महसुल विभागाचे उपायुक्त व्ही. व्ही. गुजर यांनी यावेळी सांगितली. महिला बचतगटांना अर्थसहाय्य देतांना दारिद्रयरेषेखालील महिला बचतगटांना मोठ्या प्रमाणात कर्ज उपलब्ध करुन द्यावे असे मंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी आदेशित केले. वस्तु उत्पादनाच्या वेष्टणाची तांत्रिक माहिती महिला बचतगटाना करुन द्यावी असेही त्यांनी सूचित केले.

  बैठकीत जिल्हाधिकारी विक्रम कुमार, महानगर पालिका आयुक्त प्रकाश महाजन, कार्यकारी अभियंता एस. पी. किवळेकर, सहाय्यक अधीक्षक अभियंता सुनील गुडसूडकर, उपमुख्यकार्यकारी अधिकारी (म.बा.) संजय कदम यांनी चर्चेत भाग घेतला.

 • post image sangita

  ‘स्वच्छतालेणे’ उभारणाऱ्या ओव्हाळेंचा सन्मान

  सौभाग्याचं लेणं असलेले मंगळसूत्र गहाण ठेवून त्या पैशांतून घरात शौचालय बांधणाऱ्या वाशीम जिल्ह्यातील संगीता ओव्हाळे यांचा गुरुवारी राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे पालवे यांनी त्यांच्या वरळी येथील कार्यालयात सत्कार केला.

  संगीता ओव्हाळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाने प्रेरित होऊन घरात शौचालय बांधण्याचा निर्णय घेतला. पुरेसे पैसे नसतानाही त्या व त्यांचे पती यांनी काहीही करून शौचालय बांधण्याचा निर्धार पक्का केला. ओव्हाळे यांनी त्यासाठी स्वतःचे मंगळसूत्र गहाण ठेवून त्यातून घरात शौचालय बांधले.

  स्वच्छतेप्रती संगीता ओव्हाळे यांची असलेली बांधिलकी लक्षात घेऊन राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आज त्यांच्या वरळी येथील कार्यालयात ओव्हाळे पती-पत्नींना बोलावले. संगीता ओव्हाळे यांनी गहाण ठेवलेले मंगळसूत्र परत मिळवून ते त्यांना देऊन त्यांचा सत्कार केला.

  पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या की, ‘प्रसंगी स्वतःच्या सौभाग्याचे लेणं गहाण ठेवून पंतप्रधानांच्या स्वच्छ भारत अभियानात सामील होणाऱ्या संगीताताई या राज्यातील स्वच्छतेच्या आदर्श आहेत. त्यांचा राज्याला अभिमान आहे.’ संगीताताईंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून पंतप्रधानांच्या स्वच्छ भारत अभियानात राज्यातील जनतेने सहभागी होण्याचे आवाहनही यावेळी मुंडे-पालवे यांनी केले.

 • post image

  पीडित दलित कुटुंबाच्‍या दुःखात आम्‍ही सहभागी – ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे

  अहमदनगर : पाथर्डी तालुक्‍यातील जवखेडे खालसा येथील जाधव तिहेरी हत्‍याकांडाची घटना ही क्रुर पध्‍दतीची असून ती निंदनीय आहे. पीडित दलित कुटुंबाच्‍या दुःखात आम्‍ही सहभागी आहोत. या प्रकरणाची जलदगती न्‍यायालयात सुनावणी होवून आरोपींना कठोर शिक्षा केली जाईल, अशी ग्‍वाही राज्‍याच्‍या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.

  जिल्‍ह्यातील जवखेड खालसा येथील तिहेरी दलित हत्‍याकांडाच्‍या पीडित जाधव परिवारांची श्रीमती मुंडे यांनी भेट घेवून सांत्‍वन केले. यावेळी राज्‍यमंत्री दिलीप कांबळे, जिल्‍हाधिकारी अनिल कवडे, जिल्‍हा पोलीस अधीक्षक लख्मी गौतम, आमदार मोनिका राजळे, आमदार प्रा. राम शिंदे, आमदार भीमराव धोंडे, अतिरिक्‍त पोलीस अधीक्षक सुनिता ठाकरे, अॅड. अभय अगरकर आदी उपस्थित होते.यावेळी जाधव परिवारातील वृद्ध आई वडिलांना 5 लाख रुपयांचा धनादेश मंत्री श्रीमती मुंडे यांच्या हस्‍ते देण्‍यात आला.

  मंत्री श्रीमती मुंडे म्हणाल्या, मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरिष्‍ठ पोलीस अधिकाऱ्‍यांच्‍या बैठकीत या घटनेचा तपास जलदगतीने करुन गुन्‍हेगारांना अटक करण्‍याचे निर्देश दिले आहेत. तपास कामामध्‍ये लाय डिटेक्‍टर तपासणीबरोबरच नार्को टेस्‍टही करण्‍यात येईल.

 • post image001new

  मी पंकजा गोपीनाथ मुंडे… म्हणताच वानखेडेवर जल्लोष

  मी पंकजा गोपीनाथ मुंडे… म्हणताच वानखेडेवर जल्लोष

 • post image

  आ. पंकजांच्या मध्यस्थीने ऊसतोड कामगारांचा संप मागे

  गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेला ऊसतोड कामगार वाहतूक मजूर व मुकादम संघटना महाराष्ट्र राज्य यांनी पुकारलेला संप शेतकर्‍यांचे हित लक्षात घेऊन भाजपा नेत्या आ. पंकजाताई मुंडे यांच्या शब्दाखातर मागे घेण्यात येत आहे. त्याचबरोबर एक महिन्याच्या आत सर्व ऊसतोड कामगारांना मजुरीच्या दराबरोबरच वाहतूकदारांच्या भूमिकेबाबतही निर्णय घेतला जाईल. साखर संघाचे अध्यक्ष विजयसिंह मोहिते पाटील यांच्याशी चर्चा केल्यानंतर आ. पंकजाताई मुंडे यांनी संघटनेच्या पदाधिकार्‍यांसोबत मुंबईत बैठक घेऊन हा संप मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

  ऊसतोडणी कामगारांची राज्यातील सर्वात मोठी संघटना गत तीस वर्षांपासून लोकनेते स्व. मुंडे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे. त्यांच्यानंतर आता लवादावर आ.पंकजाताई मुंडे यांची संघटनेने निवड केली आहे. कामगारांचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी साखर संघ व संघटना यांचा द्विवार्षिक करार संपल्यानंतर कामगारांच्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी या वर्षी संप पुकारला होता. ऊसतोडणी कामगारांना कामगार कायदा लागू करावा यासह १७ मागण्या, तर ऊस वाहतूकदारांच्या तीन मागण्या, मुकादम संघटनेच्या ६ मागण्या अशा २६ मागण्यांसाठी गत महिनाभरापासून एकही कामगार साखर कारखान्यावर गेलेला नाही. राज्यातील दुष्काळी परिस्थिती, ऊस उत्पादक शेतकर्‍यांची आर्थिक स्थिती, ऊसतोड मजुरांचे आर्थिक नुकसान लक्षात घेऊन आ. पंकजाताई मुंडे यांनी गुरुवारी साखर संघाचे अध्यक्ष विजयसिंह मोहिते पाटील यांच्याशी चर्चा केली.

 • new

  संघर्षयात्रेचा भाजपला ३७ ठिकाणी लाभ

  भाजप युवा मोर्चा प्रदेशाध्यक्षा पंकजा मुंडे यांची संघर्षयात्रा, तसेच स्टार प्रचारक म्हणून सभा घेतलेल्या ८६पकी ३७ मतदारसंघांत भाजपचे उमेदवार विजयी झाले. १८ मतदारसंघांत दोन्ही काँग्रेसचे उमेदवार पराभूत झाले. केवळ १६ ठिकाणी भाजपचे उमेदवार पराभूत झाले. महिनाभरात अडीचशे सभांचा विक्रम केल्याने ६७ मतदारसंघांत चांगला परिणाम झाला. आक्रमक भाषणशैली व तरुण नेतृत्व यामुळे त्यांच्या सभांनी गर्दी खेचली.
  गोपीनाथ मुंडे यांच्या अकाली निधनानंतर त्यांचा राजकीय वारसा चालवण्यासाठी पंकजा मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात घ्यावे, अशी मागणी प्रदेश भाजपने केली होती. मात्र, पक्षाने त्यांना प्रतीक्षेतच ठेवले. पंकजा यांनीही ३ महिन्यांत सावरत सिंदखेड राजा येथून पुन्हा संघर्षयात्रा सुरू केली. चार हजार किलोमीटर अंतर पार केल्यानंतर पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत चौंडी येथे यात्रेचा समारोप झाला. यात्रेला मिळालेल्या समर्थनामुळे शहा यांनी पंकजाला स्टार प्रचारक म्हणून घोषित केले.
  आक्रमक भाषणशैली, भावनिक साद, उपजत बेधडकपणा व तरुण नेतृत्वामुळे यात्रेतील सभांनी गर्दीचे उच्चांक केले. दीडशे मोठय़ा सभा, तर गावागावात ठिकठिकाणी छोटय़ा-मोठय़ा सभा झाल्या. यात्रेचा समारोप होताच विधानसभा निवडणूक प्रचाराला सुरुवात झाली व १५ दिवसांत पंकजा यांनी शंभर सभा घेतल्या. एका महिन्यात अडीचशे सभा घेण्याचा विक्रम नोंदवून पंकजा यांनी प्रचाराचा धुरळा उडविला. सभांना चांगली गर्दी झाली, इतकी की मध्यरात्रीपर्यंत लोक हजारोंच्या संख्येने वाट पाहत असत. त्यामुळे सभांचा निवडणुकीत किती परिणाम होतो, याकडे सर्वाचे लक्ष होते.
  मराठवाडा, विदर्भ, खानदेश व पश्चिम महाराष्ट्रातील ८६ मतदारसंघांच्या निवडणूक निकालात पंकजा यांच्या सभांचा चांगला परिणाम झाल्याचे दिसत आहे. शिवसेनेबरोबरची युती तुटल्यानंतरही पंकजा यांनी बीड जिल्हय़ातील सहापकी ५ जागा, तसेच लोकसभा पोटनिवडणुकीत देशात विक्रमी मतदान घेऊन विजय मिळवला. मराठवाडय़ात भाजपने पहिल्यांदाच १५ जागा जिंकल्या. पंकजा यांच्या सभा झालेल्या ३७ मतदारसंघांत भाजपचे उमेदवार विजयी झाले. १८ मतदारसंघांत दोन्ही काँग्रेसच्या उमेदवारांना फटका बसून सेना व इतर उमेदवार विजयी झाले. १२ मतदारसंघांत तिरंगी-चौरंगी लढती होऊन भाजपचे उमेदवार कमी मतांच्या फरकाने पराभूत झाले. भाजपच्या प्रदेश नेतृत्वाच्या फळीत एका महिन्यात २५० सभा घेणाऱ्या पंकजा एकमेव नेत्या ठरल्या.
  पुन्हा सत्तापरिवर्तन!
  संघर्षयात्रेचे नियोजक प्रवीण घुगे यांनी सांगितले की, गोपीनाथ मुंडे यांच्या शिवनेरी ते शिवतीर्थ या पहिल्या संघर्षयात्रेने १९९५मध्ये सत्तापरिवर्तन घडविण्यात मोठी भूमिका बजावली. त्यांच्यानंतर पंकजा मुंडे यांच्या पुन्हा संघर्षयात्रेचा सत्तापरिवर्तन घडण्यात मोलाचा वाटा राहिला. प्रचारसभांचे नियोजन करणारे प्रा. देविदास नागरगोजे म्हणाले की, संघर्षयात्रेनंतर निवडणुकीत राज्यभरातून भाजप उमेदवारांनी सभांची मागणी केली होती. दिवसाला ८ ते १२ सभा घेत पंकजा यांनी आपली क्षमता सिद्ध केली.

 • new

  मुंडे साहेबांचा बालेकिल्ला पुन्हा बीड जिल्हा…

  जनतेनी मतदानातून वाहिली लोकनेत्याला श्रध्दाजंली.

  बीड जिल्हयात निवडणुक मतदाना नंतर आज मतमोजणीला स्थगतीने सुरवात झाली.स्व.गोपीनाथ मुंडे नंतरची हि पहिलीच निवडणुक असल्यामुळे निवडणुकीला वेगळे महत्व प्राप्त झाले होते.बीड जिल्हयातील सहा विधानसभा पैकी ५ विधानसभेवर पुन्हा भाजपाने आपला झेंडा रोवला तर लोकसभेची जागा ६ लाख ९२ हाजाराच्या फरकाने रेकार्डब्रेक करत काबीज केली.बीड विधानसभेची जागा राष्ट्रवादीला राखण्यात यश आले.
  सविस्तर वृत्त असे कि बीड जिल्हयात लोकसभेची पोटनिवडणुक व विधासभेच्या ६ जागा साठी १५ ऑक्टोबरला मतदान झाल्या नंतर आज दि.१९ रोजी सकाळी ८ वाजल्यापासुन मतमोजणीला बीड येथील कृर्षीउत्तपन्न बाजासमीतीच्या मोठया गोडाऊन मध्ये सुरवात झाली.परळी,गेवराई,माजलगाव,केज,आष्टी पाटोदा विधासभा काबीज करण्यात भाजपाला यश आले.परळी मधून पंकजा मुंडे २६१८४ मतानी विजयी,गेवराई मधून लक्ष्मण पवार ६० हजार ३२ मतानी विजयी,माजलगाव मधून आर.टी.देशमुख ३७ हजार ६३६ मतानी विजयी,केज मधून संगिता ठोबंरे ४३ हजार ४३६ मतानी विजयी,आष्टी-पाटोदा मतदारसंघातून भिमराव धोडे ५ हजार ७५६ मतानी विजयी झाले तर बीडची विधासभा राष्ट्रवादीने राखली या ठिकाणी राष्ट्रवादीचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर ६०८५ मतानी विजयी झाले.
  मतमोजणी स्थळी पोलिस बदोबस्त चोख असल्यामुळे शांततेत मतमोजणी पार पडली.जिल्हाधिकारी नवलकिशोर राम व जिल्हाधिक्षक रेड्डी यांनी योग्य नियोजन करत ही निवडूक प्रक्रिया पार पाडली.

  ६ विधानसभेची निकाल
  बीड जिल्हयात एकूण ६ विधानसभा आहेत.
  १) बीड विधानसभा मतदारसंघ- राष्ट्रवादीने गड राखला
  बीड विधानसभा मतदार सघांत आत्यंत चुरशीची दुरंगी लढत पहायला मिळाली.राष्ट्रवादी कडून माजी पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर हे होते तर भाजपाकडून शिवसग्रामचे संस्थापक विनायक मेटे हे होते शेवटच्या फेरे पर्यत पारडे कोणत्या बाजुला झुकते याचा अदांज काढता आला नाही.शेवटी ३४ फेरी आखेर क्षीरसागरांनी निणार्यक आघाडी घेतली व ६०८५ मतानी ते निवडुण आल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी घोषीत केले.

  २) गेवराई विधानसभा मतदार संघ- लक्ष्मण पवार यांनी घडयाळाची टिकटिक थोपवली
  गेवराई मतदारसंघातही दुरंगी लढत पहायला मिळाली.राष्ट्रवादी कडून बदामराव पंडीत हे होते तर भाजपाकडून लक्ष्मण पवार हे निवडणुक लढवत होते.गेवराईची जनता पंडीता विटल्याचेच या निवडणूकीच्या निकालावरून स्पष्ट झाले भाजपाचे लक्ष्मण पवार यांनी त्यांचे निकटवर्ती बदामराव पंडीत यांचा ६००३२ येवढया मोठया फरकाने दनदनीत पराभव केला.

  ३) आष्टी-पाटोदा-शिरूर विधानसभा मतदार संघ- भिमराव धोंडे यांना राष्ट्रवादीच्या पैलवान गारद करण्यात यश
  आष्टी-पाटोदा-शिरूर या मतदार संघात ही दुरंगी लढत पहायला मिळाली.राष्ट्रवादीकडून माजी मंत्री सुरेश धस हे सलग ३ वेळा विधासभेवर निवडूण आलेले उमेदवार होते तर भाजपाकडून लोकसभेच्या तोडावर भाजपात प्रवेश केलेले भिमराव धोंडे हे उमेदवार होते येथे ही निवडणुक अत्यंत चुरशीची पहायला मिळाली.शेवटच्या फेरीपर्यत पारडे कधी धसांकडे तर कधी धोंडे कडे झुकत असल्याचे दिसून आले.४२ व्या निर्णक फेरी आखेर भिमराव धोंडे यांनी ५७५६ मतदानी सुरेश धस यांचा पराभव केला व आपला विजय नोदंवला.

  ४)माजलगाव विधासभा मतदार संघ- आर.टी.च्या स्वभावाचा फायदा झाला..
  मजालगाव विधासभा मतदार संघातही दुरंगी सामना पहावयास मिळाला.राष्ट्रवादी कडून माजी मंत्री प्रकाश सोळंके हे उमदेवार होते तर भाजपा कडून गेल्या विधासभेला थोडयामताने पराभूत झालेले आर.टी.देशमुख हे उमेदवार होते प्रकाश सोळंके यांनी माजलगाव मतदार संघातील एकला चलोचे धोरण त्यांच्या अंगलट आल्याचेच दिसले.शेवटी ३७ व्या फेरी अखेर ३७६३६ हजार मतानी प्रकाश सोळंके यांचा पराभव भाजपाचे आर.टी.देशमुख यांनी केला.
  ५) केज विधासभा मतदार संघ- संगिता ठोबंरे यांना लोकजनसंर्पकाचा फायदा झाला..
  केज विधासभा मतदार संघात तिरंगी फाईट होईल असे वाटत होते परंतू दुरंगीच लढत झाल्याचे चित्र दिसले.राष्ट्रवादीच्या उमेदवार व स्व.विमल मुंदडा यांची सुन नमिता मुंदडा या नवख्या उमदेवार होत्या तर भाजपाच्या गत पोटनिवडूकीत थोडया मताने पराभूत झालेल्या संगिता ठोबंरे या उमेदवार होत्या.३७ व्या फेरी आखेर भाजपाच्या संगिता ठोबंरे यांनी ४३४३६ मतानी राष्ट्रवादीच्या उमदेवार नमिता मुदंडा याचा पराभव केला.हा मतदार संघ एस्सी प्रर्वगासाठी राखीव होता या मतदारसंघात ४ प्रमुख पक्षाच्या महिलाच उमेदवार होत्या त्यामुळे या निवडणूकीला आगळेवेगळे महत्व प्राप्त झाले होते.
  ६) परळी विधासभा मतदार संघ – परळीच्या जनतेने मुख्यमंत्रीपदासाठी दिला पंकजा मुंडेना विजयी कौल
  परळी मतदारसंघ तसा स्व.गोपीनाथ मुंडे यांचा मतदारसंघ विद्यमान आमदार पंकजा मुंडे या भाजपाच्या उमदेवार होत्या तर राष्ट्रवादी कडून त्यांचे चुलत भाऊ धंनजय मुंडे हे उभे होते.या ठिकाणी भाऊबंदकीची निवडणुक होती. मुंडे साहेबांची प्रचंडसहानुभूती व पंकजा मुंडे यांनी मतदारसंघात जलसिचंनाची केलेली कामे यामुळे या निवडणुकीत पंकजा मुंडे यांना जनतेने कौल दिला त्या २६१८४ मताच्या फरकाने विजयी झाल्या.

  बीड लोकसभा पोट निवडणूक – मुंडे साहेबांना जनतेची विश्वविक्रमी मताची श्रधाजंली

  बीड लोकसभेत केंद्रीय ग्रामविकस मंत्री स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या प्रचंड सहानुभूतीची लाट होती.त्यांची कन्या डॉ.प्रितम गोपीनाथराव मुंडे या भाजपाकडून उमेदवार होत्या तर राष्ट्रवादीने या निवडणुकीत उमेदवार दिलेला नव्हता.राष्ट्रीय कॉंग्रेसने माजी मंत्री अशोक पाटील यांना उमेदवारी दिली होती परंतू जनतेनेच हि निवडणुक हातात घेतल्यामुळे डॉ.प्रितम मुंडे यांचा विश्वविक्रमी मताने दनदणीत विजय झाला. जवळ पास ६ लाख ९२ हाजाराच्या फरकाने त्या विजयी झाल्या.जनतेने या निवडणुकीतून लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडे यांना बीड जिल्ह्याच्या जनतेने मतदानरूपी श्रध्दांंजलीच वाहिली असे या निकालावरून स्पष्ट झाले.

  किती मतांनी विजय झाला…
  लोकसभेत विजयी उमेदवार – डॉ.प्रितम गोपीनाथ मुंडे -६ लाख ९२ हाजाराने विजयी (भारतीय जनता पार्टी)
  परळी विधासभा मतदार संघ -पंकजा मुंडे – २६ हाजार १८४ मतानी विजयी(भारतीय जनता पार्टी)
  गेवराई विधानसभा मतदारसंघात विजयी उमेदवार- लक्ष्मण पवार -६० हाजार ३२ मतानी विजयी (भारतीय जनता पार्टी)
  माजलगाव विधासभा मतदार संघ- आर.टी.देशमुख -३७ हजार ६३६ मतानी विजयी(भारतीय जनता पार्टी)
  केज विधासभा मतदार संघ- संगिता ठोबंरे -४३ हजार ४३६ मतानी विजयी(भारतीय जनता पार्टी)
  आष्टी-पाटोदा-शिरूर विधानसभा मतदार संघ- भिमराव धोंडे -५७५६ मतानी विजयी(भारतीय जनता पार्टी)
  बीड विधानसभा मतदारसंघ-जयदत्त क्षीरसागर – ६०८५ पतानी विजयी (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी)

 • post image new

  मुंडेंचा बालेकिल्ला पंकजानी राखला, भाजपाचा षटकार क्षीरसागारनी रोखला

  मुंडेंचा बालेकिल्ला पंकजानी राखला, भाजपाचा षटकार  क्षीरसागारनी  रोखला

 • post image2

  कोणत्याही स्थितीत राष्ट्रवादी सोबत जाणार नाही

  कोणत्याही स्थितीत राष्ट्रवादी सोबत जाणार नाही

Page 20 of 29« First...10...1819202122...Last »