• post image

    आ. पंकजांच्या मध्यस्थीने ऊसतोड कामगारांचा संप मागे

    गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेला ऊसतोड कामगार वाहतूक मजूर व मुकादम संघटना महाराष्ट्र राज्य यांनी पुकारलेला संप शेतकर्‍यांचे हित लक्षात घेऊन भाजपा नेत्या आ. पंकजाताई मुंडे यांच्या शब्दाखातर मागे घेण्यात येत आहे. त्याचबरोबर एक महिन्याच्या आत सर्व ऊसतोड कामगारांना मजुरीच्या दराबरोबरच वाहतूकदारांच्या भूमिकेबाबतही निर्णय घेतला जाईल. साखर संघाचे अध्यक्ष विजयसिंह मोहिते पाटील यांच्याशी चर्चा केल्यानंतर आ. पंकजाताई मुंडे यांनी संघटनेच्या पदाधिकार्‍यांसोबत मुंबईत बैठक घेऊन हा संप मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

    ऊसतोडणी कामगारांची राज्यातील सर्वात मोठी संघटना गत तीस वर्षांपासून लोकनेते स्व. मुंडे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे. त्यांच्यानंतर आता लवादावर आ.पंकजाताई मुंडे यांची संघटनेने निवड केली आहे. कामगारांचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी साखर संघ व संघटना यांचा द्विवार्षिक करार संपल्यानंतर कामगारांच्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी या वर्षी संप पुकारला होता. ऊसतोडणी कामगारांना कामगार कायदा लागू करावा यासह १७ मागण्या, तर ऊस वाहतूकदारांच्या तीन मागण्या, मुकादम संघटनेच्या ६ मागण्या अशा २६ मागण्यांसाठी गत महिनाभरापासून एकही कामगार साखर कारखान्यावर गेलेला नाही. राज्यातील दुष्काळी परिस्थिती, ऊस उत्पादक शेतकर्‍यांची आर्थिक स्थिती, ऊसतोड मजुरांचे आर्थिक नुकसान लक्षात घेऊन आ. पंकजाताई मुंडे यांनी गुरुवारी साखर संघाचे अध्यक्ष विजयसिंह मोहिते पाटील यांच्याशी चर्चा केली.

1 Comment

  1. Santosh Garje says: November 2, 2014 at 11:07 amReply

    Tai GRAMVIKAS MANTRI mhanun nivadisathi HARDIK ABHINANDAN. Ustod kamgarachya mage samarthpane ubhe rahun kharya arthane SAHEBANCHA wasa ghetalyabaddal dhanyawad.