• post image

    पीडित दलित कुटुंबाच्‍या दुःखात आम्‍ही सहभागी – ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे

    अहमदनगर : पाथर्डी तालुक्‍यातील जवखेडे खालसा येथील जाधव तिहेरी हत्‍याकांडाची घटना ही क्रुर पध्‍दतीची असून ती निंदनीय आहे. पीडित दलित कुटुंबाच्‍या दुःखात आम्‍ही सहभागी आहोत. या प्रकरणाची जलदगती न्‍यायालयात सुनावणी होवून आरोपींना कठोर शिक्षा केली जाईल, अशी ग्‍वाही राज्‍याच्‍या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.

    जिल्‍ह्यातील जवखेड खालसा येथील तिहेरी दलित हत्‍याकांडाच्‍या पीडित जाधव परिवारांची श्रीमती मुंडे यांनी भेट घेवून सांत्‍वन केले. यावेळी राज्‍यमंत्री दिलीप कांबळे, जिल्‍हाधिकारी अनिल कवडे, जिल्‍हा पोलीस अधीक्षक लख्मी गौतम, आमदार मोनिका राजळे, आमदार प्रा. राम शिंदे, आमदार भीमराव धोंडे, अतिरिक्‍त पोलीस अधीक्षक सुनिता ठाकरे, अॅड. अभय अगरकर आदी उपस्थित होते.यावेळी जाधव परिवारातील वृद्ध आई वडिलांना 5 लाख रुपयांचा धनादेश मंत्री श्रीमती मुंडे यांच्या हस्‍ते देण्‍यात आला.

    मंत्री श्रीमती मुंडे म्हणाल्या, मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरिष्‍ठ पोलीस अधिकाऱ्‍यांच्‍या बैठकीत या घटनेचा तपास जलदगतीने करुन गुन्‍हेगारांना अटक करण्‍याचे निर्देश दिले आहेत. तपास कामामध्‍ये लाय डिटेक्‍टर तपासणीबरोबरच नार्को टेस्‍टही करण्‍यात येईल.