• 15267878_1165569166861976_5331443061911820281_n

    बाबासाहेबांचे विचार आजही मार्गदर्शक – पंकजा मुंडे

    मुंबई : महिलांचे राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक स्वातंत्र आणि स्थैर्य महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानामुळे आहे. स्वातंत्र्यानंतरही देशाला बाबासाहेबांचे विचार प्रेरणादायी ठरत आहेत, असे महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आज येथे सांगितले.

    भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर येथील चैत्यभूमी येथे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना श्रीमती मुंडे यांनी पुष्पअर्पण करून अभिवादन केले, त्यावेळी त्या बोलत होत्या.

    श्रीमती मुंडे म्हणाल्या की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय संघर्ष करून समाजात शैक्षणिक, सामाजिक, राजकीय प्रगती घडवून आणली. समाजातील दुर्बल घटकाला मुख्य प्रवाहात आणले तसेच महिलांसाठीचे त्यांचे कार्य फार मोलाचे आहे. आज महिलांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळाले आहे. त्यांचे विचार आजही प्रेरणादायी असून, भविष्यातही मार्गदर्शक ठरतील.