• pankaja-munde-1

    अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे मानधन ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार – पंकजा मुंडे

    नागपूर,(प्रतिनिधी)राज्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना त्यांचे मानधन देण्यास विलंब होऊ नये यासाठी त्यांचे आधारकार्ड लिंक करुन ऑनलाईन पद्धतीने त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल.मूर्तिजापूर, जि. अकोला येथील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे मानधन देण्यास विलंब करणाऱ्या लिपिकास निलंबित करण्यात आले असून अधिक चौकशीत तो दोषी आढळल्यास त्यास बडतर्फ करु, अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आज विधानसभेत दिले.

    याबाबतचा प्रश्न सदस्य गोवर्धन शर्मा यांनी विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देताना त्या बोलत होत्या. यावेळी बोलताना श्रीमती मुंडे म्हणाले की, एकात्मिक बाल विकास योजना मुर्तिजापूर, जि. अकोला कार्यालयातील देयके तयार करणारे कनिष्ठ सहाय्यक अनधिकृतपणे गैरहजर असल्याने अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे मानधन देण्यास विलंब झाला होता. आता सर्वांचे मानधन देण्यात आले असून यापुढे विलंब होऊ नये यासाठी त्यांचे आधारकार्ड लिंक करुन ऑनलाईन पेमेंट करण्यात येणार आहे. या प्रकरणी संबंधित कर्मचाऱ्यांस निलंबित करण्यात आले असून त्याचे यापूर्वीचे रेकॉर्ड व वर्तणूक तपासून त्यास आवश्यकता भासल्यास त्यास सेवेतून बडतर्फ करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य सर्वश्री हरिश पिंपळे, जयंत पाटील, पांडुरंग वरोरा आदी सदस्यांनी सहभाग घेतला.