• WhatsApp Image 2017-01-20 at 2.49.10 PM

    गहिनीनाथ गडाच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नही – पंकजा मुंडे

    वामनभाऊ यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गहिनीनाथ गडाच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, आगामी काळात रस्ते, पाणी पुरवठा, सभागृह या सुविधा दिल्या जातील अशी माहिती राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी दिली आहे. बीड जिल्ह्यातील गहिनीनाथ गडावर आयोजित वामानभाऊंच्या ४१ व्या पुण्यतिथी महोत्सवास पंकजा मुंडे, खा.प्रीतम मुंडे, आमदार जयदत्त क्षीरसागर, भीमराव धोंडे यांची उपस्थिती यावेळी होती. गडाचे महंत विठ्ठल महाराज यांनी सर्वांचं स्वागत केलं. गहिनीनाथ गडाला मोठी अध्यात्मिक परंपरा आहे, दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे तसेच विलासराव देशमुख यांची गडावर श्रद्धा होती. गडाचा विकास हेच आपले ध्येय आहे असं सांगत परोपकार करा हा संतांचा संदेश आहे तर पराक्रम करून सत्तेचा वापर जनतेसाठी करा हा आमचा धर्म आहे असे पंकजा मुंडेनी यावेळी सांगितले. या महोत्सवासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखोंच्या संख्येने भाविक उपस्थित होते.