• ahmadnagar

    अहमदनगर : एल्गार-against-आघाडी-सरकार

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सत्तेची आणि पैशाची मस्ती आली आहे. जनताच ती मस्ती उतरवेल”, असं टीकास्त्र भाजप आमदार पंकजा मुंडे यांनी सोडलं. रविवारी (दि.२८) रोजी अहमदनगरमध्ये भाजपचा युवा निर्धार मेळावा पार पडला. यावेळी त्यांनी अजित पवारांवर टीकेचा भडिमार केला. भाजपच्या युवा प्रदेशाध्यक्षपदी पंकजा मुंडे यांची निवड झाल्यानंतर त्यांनी राज्यव्यापी दौऱ्याला सुरुवात केलीय. त्यांनी काल अहमदनगरमध्ये युवा निर्धार मेळावा घेतला. यावेळी पंकजा मुंडे यांनी अजित पवारांवर टीकास्त्र सोडलं. सोलापूर येथील अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्याचा जोरदार निषेध करत, त्यांना पैशाची आणि सत्तेची मस्ती चढल्याचा आरोप, पंकजा मुंडे यांनी केला आहे. एवढ्यावरच त्या थांबल्या नाहीत तर ती मस्ती उतरवण्याची ताकद भारतीय जनता पार्टीमध्ये असून ती मस्ती आम्ही उतरवणार असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. इतकंच नाही, तर नुकत्याच मराठवाड्यात झालेल्या जेलभरो आंदोलनानंतर, आता तुळजापूरला जाऊन तुळजाभवानीसमोर राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीविरोधात एल्गार करणार असल्याचंही, पंकजा मुंडे यांनी सांगितलं. महागाईने ग्रासलेल्या जनतेची सरकार चेष्टा करत असल्याचा आरोप, मुंडे यांनी यावेळी केला.