• tuljapur

    तुळजापूर : एल्गार-against-आघाडी-सरकार

    दि. ७-०८-२०१३ रोजी भाजयुमोच्या प्रदेशाध्यक्ष पंकजा मुंडे-पालवे यांनी तुळजापूरच्या भवानी मातेचे दर्शन घेऊन ” एल्गार against आघाडी सरकार ” च्या आंदोलनासाठी सर्व महाराष्ट्रातील जनतेतर्फे आशीर्वाद घेतले. सर्वप्रथम काल हुतात्मे झालेल्या वीर भारतीय जवानांसाठी व त्यांच्या कुटुंबियांसाठी भवानी मातेकडे प्रार्थना केली . केंद्रातील यूपीए सरकारच्या विरोधात भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने ‘ एल्गार ‘ पुकारण्यात आला आहे. प्रदेश भाजयुमोच्या वतीने आयोजित या राज्यव्यापी कार्यक्रमास येत्या शुक्रवारी (ता.९) पुण्यातून सुरुवात होणार आहे. भाजयुमोच्या प्रदेशाध्यक्ष पंकजा मुंडे-पालवे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. दोन दशकांपूर्वी भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी राज्यात संघर्ष यात्रा काढली होती. त्या धर्तीवर यंदाही महाराष्ट्र ढवळून काढण्यात येणार आहे. ‘ विविध लोकसभा मतदारसंघांमध्ये मेळावे घेण्यात येणार असून राज्यातील जनतेच्या असंतोषाला व्यासपीठ देण्यात येईल ,’ असे पंकजा मुंडे यांनी सांगितले. क्रांतिदिनाच्या दिवशी सकाळी अकरा वाजता बालगंधर्व रंगमंदिरामध्ये संघटनेचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांच्या हस्ते याचा प्रारंभ होणार आहे. ‘ प्रामुख्याने युवकांच्या प्रश्नांवर यामध्ये भर देण्यात येणार आहे. त्यामध्ये शिष्यवृत्ती , बेरोजगारी , युवा धोरण आणि युवकांसमोरील आव्हानांची चर्चा करण्यात येईल ,’ असे त्या म्हणाल्या. महाविद्यालयांमधील निवडणुका पुन्हा सुरू करण्याचे सूतोवाच सरकारने केले आहे , त्याचे मुंडे यांनी स्वागत केले. महागाईने ग्रासलेल्या जनतेची सरकार चेष्टा करत असल्याचा आरोप, मुंडे यांनी यावेळी केला.