• MNAIMAGE40205Pankaja Munde

  अंगणवाडी कर्मचाऱ्यांना वाढीव मानधन मिळणार

  मुंबई : राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना वाढीव मानधन मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला असून यासाठी आवश्यक निधीची तरतूद आणि सर्व मंजुऱ्या प्राप्त झाल्या आहेत. या कर्मचाऱ्यांना सध्या एप्रिल २०१५ पासून वाढीव मानधन देण्यात येणार आहे. ही मानधनवाढ तातडीने लागू करावी याबाबत एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या आयुक्तांना निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.

  तसेच एप्रिल २०१४ ते मार्च २०१५ पर्यंतच्या वाढीव मानधनासाठी पुरवणी मागणीद्वारे विधीमंडळाच्या अधिवेशनात मान्यता घेऊन तो फरकही लवकरच देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

  अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधनवाढ देण्याचा प्रश्न काही काळ प्रलंबित होता. शासनाने एप्रिल २०१४ पासून मानधनवाढ देण्याचे जाहीर केले होते. पण त्यासाठी आर्थिक तरतूद न झाल्याने हा प्रश्न रेंगाळला होता. त्या पार्श्वभूमीवर महिला आणि बालविकास मंत्री श्रीमती मुंडे यांनी या प्रश्नी लक्ष घालून आणि वित्त विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करुन मानधनवाढीसाठी निधीची उपलब्धता केली आहे. त्यानुसार सध्या एप्रिल २०१५ पासून मानधनवाढ देण्यात येणार असून शासनाच्या महिला आणि बालविकास विभागामार्फत एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या आयुक्तांना तसे निर्देश देण्यात आले आहेत. याशिवाय एप्रिल २०१४ ते मार्च २०१५ पर्यंतच्या वाढीव मानधनाचा फरक देण्यासाठी पुरवणी मागणीद्वारे विधीमंडळाच्या अधिवेशनात मान्यता घेऊन तो फरकही लवकरच देण्यात येईल, असे श्रीमती मुंडे यांनी सांगितले.

  नव्या निर्णयानुसार आता अंगणवाडी सेविकांना ५ हजार रुपये, मिनी अंगणवाडी सेविकांना ३ हजार २५० रुपये तर मदतनीसांना २ हजार ५०० रुपये प्रमाणे मानधन देण्यात येणार आहे. यासाठी पावसाळी अधिवेशनात इतर काही बाबींच्या तरतुदीसह २२८ कोटी ४५ लाख रुपये एवढ्या रकमेच्या पुरवणी मागणीला विधीमंडळाने मंजुरी दिली आहे, असे श्रीमती मुंडे यांनी सांगितले.

  अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधनवाढीसाठी राज्याचे वित्त आणि नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भरीव आर्थिक तरतूद केल्याने श्रीमती मुंडे यांनी त्यांचे आभार मानले.

   

 • 55a0dd5f9d76c

  हरितक्रांती ते जलक्रांती व्हाया जलयुक्त शिवार योजना

  ‘महाराष्ट्र राज्याचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांचे सुजलाम सुफलाम महाराष्ट्र राज्य आणि वसंतराव नाईक यांचे हरित क्रांतीचे स्वप्न साकार करण्यासाठी ग्रामीण विकास मंत्री ना.पंकजा मुंडे यांच्या समृद्ध कल्पनेतून साकार झालेली जलयुक्त शिवार योजना एकीकडे पुरेसी ठरत आहे तर दुसरीकडे पाणि टंचाई आणि दुष्काळी परिस्थितीवर रामबाण उपाय ठरू लागली असतांनाच ना.मुंडे यांच्या जलयुक्त शिवार योजना या महत्वाकांक्षी योजनेचा आदर्श राजस्थानच्या मुख्यमंत्री वसूंधरा राजे यांनी घेवून वाळवंटी प्रदेश म्हणून ओळखला जाणा-या राजस्थानला सुजलाम सुफलाम करण्याचे स्वप्न मुख्यमंत्री वसुंधरा राजे पाहू लागल्या आहेत. एवढेच नव्हे तर देशातील अन्य दुष्काळग्रस्त राज्य सुद्धा जलयुक्त शिवार योजना राबविण्यास उत्सुक आहेत त्यामुळे ना.पंकजा मुंडे यांचा हा प्रकल्प देशासाठी वरदान ठरणारा आहे’
  महाराष्ट्र राज्यातील शासन आणि प्रशासनाच्या इतिहासाचे पाने चाळले असता राज्याच्या ५५ वर्षाच्या कार्यकाळात शासन प्रशासन आणि विकास यांची सांगड घालून सामुहिक विकासाचे चक्र गतीमान करण्याचे कौशल्ये हाताच्या बोटावर मोजण्या एवढ्याच शासन कत्र्यांना जमल्याचे आढळते. ज्या शासन कत्र्याना हे कौशल्य अवगत झाले तेच शासनकर्ते महाराष्ट्र राज्याच्या इतिहासात आपल्या कर्तृत्वाचा आणि नेतृत्वाचा ठसा उमटू शकले त्यात महाराष्ट्र राज्याचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, वसंतराव नाईक, शंकरराव चव्हाण, बँ. ऐ.आर. अंतुले, शरद पवार, सुधाकरराव नाईक, विलासराव देशमुख, गोपीनाथराव मुंडे, या शासन कत्र्यांचे कार्य राज्याच्या कायम स्मरणात राहणारे आणि राज्याच्या सामुहिक विकासाला गतीमान करणारे ठरले.
  महाराष्ट्र राज्याचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्र राज्य सुजलाम सुफलाम होण्यासाठी कृषी उद्योगाची मुहूर्तमेढ रोवून नव्या कृषी ज्ञान आणि तंत्रज्ञानाचा पुरस्कार केला. कृषी पुरक सहकार चळवळीचे बिजारोपन केले. यशवंतराव चव्हाण यांच्या पावलावर पाऊल ठेवत वसंतदादा पाटील यांनी राज्यात कृषी पुरक सहकारी साखर कारखानदारीसह अन्य कृषी उद्योगांना पाठबळ देवून सिंचनावर भर दिला वसंतराव नाईक यांनी आपल्या काळात यशवंतराव चव्हाण यांचे सुजलाम सुफलाम महाराष्ट्रचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज्यात नव्या ध्येयाने हरित क्रांती घडवून आणण्यासाठी कृषी क्षेत्रातील नवे ज्ञान शेतक-यांच्या बांधापर्यंत पोव्हचविण्यासाठी राज्यात कृषी विद्यापीठ, कृषी शिक्षण, सिंचनाच्या धडकयोजना राबविल्या शंकरराव चव्हाण यांनी राज्यात कृषी विकासाचे महत्व व गरज ओळखून विविध जलप्रकल्प, सिंचनप्रकल्प उभारले व लाखो हेक्टर जमीन ओलीताखाली आनली. बॅ.ऐ.आर अंतुले यांनी शेतक-यांसाठी छोट्या छोट्या विविध योजना राबविल्या यशवंतराव चव्हाण यांच्या पुरोगामी विचार सरणीचा प्रभाव असणा-या शरद पवार यांनी सुजलाम सुफलाम महाराष्ट्र राज्य निर्मीतीसाठी आणि विशेष कृषी विकासासाठी सिंचनक्षेत्र वाढवण्यासाठी पाटबंधारे खात्याद्वारे राज्यात विविध सिंचन प्रकल्प उभारले, सहकारी साखर उद्योगाला पाठबळ दिले. शेतक-यांसाठी आधारवड ठरणारी धडक फळबाग योजना धडक. जवाहर विहीर योजना, शेतक-यांना आधार देणारी कर्जमाफी योजना राबविल्या. सुधाकरराव नाईक यांनी यशवंतराव चव्हाण आणि वसंतराव नाईक यांचे कृषीविकासाचे धोरण नव्याने राबवून कृषी विकासाच्या धडक योजना कार्यान्वित केल्या. विलासराव देशमुखांनी वरिल सर्व थोर नेत्यांच्या कृषी विकासाच्या योजनांना पाठबळ देवून पुढे चालू ठेवल्या व नव्याने कृषी क्षेत्रासाठी वरदान ठरणारी साखळी बंधारे योजना राबवून सिंचन क्षेत्र वाढविण्यावर भर दिला राज्यातील सत्तेची सुत्रे अल्पकाळ हाती असतांना गोपीनाथराव मुंडे यांनी कृषी उत्पनांना अधीक भाव मिळवून देण्या बरोबरच कृषीपूरक साखर उद्योगाला नवसंजिवनी दिली. त्यामुळे झोन बंदीमध्ये अडकलेला ऊस उत्पादक शेतकरी मुक्त झाला. या बरोबरच अन्य कृषीपुरक उद्योग उभारणीवर भर देवून कृषी विद्युतीकरणाचे जाळे विनले.
  राज्याच्या ३३ वर्षाच्या कार्यकाळात सुजलाम सुफलाम महाराष्ट्र उभारणीसाठी विविध स्तरावर प्रयत्न झाल्यामुळे महाराष्ट्र राज्य अन्नधान्य व इतर कृषी उत्पानाच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाले कृषी उत्पादन निर्यातिकरू शकले असले तरी गेल्या काही वर्षापासून राज्यात पर्जन्यवृष्टीच्या असमतोलामुळे राज्यातील आनेक भागात दुस्काळदृष्य परिस्थिती निर्माण झाली. दरवर्षी अत्यल्प पर्जन्यवृष्टीमुळे ६०० फूट खोलपर्यंत पाणिपातळी गेल्याने राज्यातील आनेक भागात पाणि टंचाई, चाराटंचाई निर्माण झाली एवढेच नव्हे तर पिण्याच्या पाण्यासाठी लोकांचे स्थलांतर होऊ लागले, लोक पाण्याच्या शोधात राणोमाळ भटकु लागले. शेतकरी कर्जबाजारी झाला. राज्यातील मराठवाडा विदर्भ व राज्याच्या उर्वरित भागात दरवर्षी दुस्काळी परिस्थिती निर्माण होऊ लागली असंख्य तालुके टंचाईग्रस्त म्हणून शिक्कामोर्तब झाले. शेतीउत्पन्न घटल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाल्याने आनेक भागातील शेतक-यांनी कर्जबाजारी पणाला कंटाळून आत्महत्या केल्या दरवर्षी होणारी अल्प अल्प पर्जन्यवृष्टीमुळे दरवर्षी पडणारा दुस्काळ निर्माण होणारी पाणि चारा टंचाई यांच्या मुळाचा शोध घेत पावसाचा प्रत्येक थेंब अडवून तो जिरवला तरच भुुगर्भातील पाणि पातळी उंचावेल व पाणि टंचाई आणि चारा टंचाईवर मात करता येईल या आत्मविश्वासाने राज्याच्या ग्रामविकास मंत्री म्हणुन प्रथमच जबाबदारी सांभाळण्याचा ना.पंकजाताई मुंडे यांनी, राज्यातील विविध भागाच्या बेसीक विकासाची नाडी ओळखून ‘सर्वांसाठी पाणि’ हे ब्रीद घेवून ‘जलयुक्त शिवार योजना’ आखली ही योजना अल्पअल्प काळात कार्यान्वित करून राज्यातील दुष्काळी परिस्थितीला कायमची मुठमाती देण्याचा निर्धार केला, महाराष्ट्रातील वाडी वस्ती पर्यंतच्या माणसापर्यंत या महत्वकांक्षी प्रकल्पाचे महत्व मनावर रूजविले. ना.पंकजाताईच्या जलयुक्त शिवार योजनेतून जलसिंचन क्रांती घडून येणार असल्याचा विश्वास लोकमनात निर्माण झाला आणि पाहता पाहता या महत्वकांक्षी प्रकल्पास लोकाश्रय मिळाला. ना.पंकजातार्इंच्या नेतृत्वाखाली थेट जलयुक्त शिवार योजनेचे कामे युद्ध पातळीवर सुरू झाले पहिल्याच पावसात ठिक-ठिकाणी डोळ्याचे पारणे फेडणारे पाणी साठे दिसू लागले.
  मराठवाड्याचा दिवसेंदिवस होत असलेला वाळवंट आणि दरवर्षी निर्माण होणारी पाणि टंचाई व दुुस्काळी परिस्थिती यावर जलयुक्त शिवार योजनारामबाण उपाय ठरणार हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही. मराठवाड्यातून पाणिटंचाई आणि दुस्काळ या प्रश्नांना कायमची मुठ माती देण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान हा प्रकल्प धडक योजनेद्वारे आगामी दहा वर्षे राबविण्याचे नियोजन झाले तर मराठवाडा ख-या अर्थाने सुजलाम सुफलाम होणार यात शंका नाही.
  जलयुक्त शिवार अभियानाच्या पहिल्या टप्यात मराठवाढ्यातील १६८२ गावांची निवड करण्यात आली. त्या गावात २६२२२ पाणि सिंचनाचे कामे करण्याचे उद्दिष्ट्ये निश्चित करण्यात आले निवड करण्यात आलेल्या ह्या गावापैकी १५९० गावात जुन २०१५ पर्यंत १५५४४ जलसिंचनाचे कामे पुर्व झाले आहेत तर १०६७८ जलसिंचनाचे कामे प्रगतिपटावर आहेत. या कामात पाणलोट क्षेत्र विकास नद्या-नाले खोलीकरण व रूंदीकरण सखळी सिमेंट काँक्रीट नाला बंधारे ओढे नाले जोड प्रकल्प, विहीर, विंधन विहीर जलपुर्नभरण, पाण्याच्या सिंचनाचे स्त्रोत बळकट करणे इत्यादी प्रकल्पाचे कामे हाती घेण्यात आले.
  जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत मराठवाढ्यातील आठ जिल्ह्यात जिल्हानिहाय कामे औरंगाबाद १७५९ जालना १५२३ बीड ५८९ परभणी १६९१ हिंगोली १५६८ नांदेड २१९२ लातूर १७७० उस्मानाबाद ४४५२ या पैकी १५५४४ कामे पूर्ण झाले आहेत तर १०६७८ एवढी कामे प्रगतीपथावर आहेत. जलयुक्त शिवार अभियानाच्या पहिल्या टप्यात सर्वाधिक कामे मराठवाड्यातील वाळवंट प्रदेश म्हणून ओळखल्या जाणा-या उस्मानाबाद जिल्ह्यात जलसिंचनाचे कामे हाती घेण्यात आले आहेत त्यांची संख्या ३३७८ आहे त्या नंतर परभणी जिल्ह्यात २०३१ कामे आहेत उर्वरित जिल्ह्यात प्रगती पथावर असणारे कामे औरंगाबाद १६०४ जालना १२२० बीड ६७३ हिंगोली ८४ नांदेड ९३२ लातूर ६५६. आहेत.
  मराठवाड्यासाठी वरदान ठरणा-या जलयुक्त शिवार अभियान योजनेसाठी मराठवाड्यातील जलयुक्त शिवार योजनेवर राज्य शासनाने २८० कोटी ५२ लाख रूपये खर्च करण्याचे पहिल्या टप्यात निधी देण्यात आला आहे तर श्री सिद्धी विनायक ट्रस्ट मुंबई कडून मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यासाठी जलयुक्त शिवार योजनेवर एककोटी रूपये खर्च करणार आहे त्याबरोबरच श्री साईबाबा संस्थान शिर्डी द्वारे ही प्रत्येक जिल्ह्याला एक कोटीचा निधी देण्यात आला आहे. आजपर्यंतच्या अभियानावर खर्चासाठी एकूण २९६ कोटी ५२ लाख रूपये निधी प्राप्त झाला.
  मराठवाड्यातील विविध प्रकल्पातील गाळ काढणे पाणि आडवून जिरविणे व पाणी पातळी वाढविणे हे मुख्य उद्दिष्ट्ये आहे. मराठवाड्यातील आठ जिल्हयातील १६८२ गावांमध्ये १९१६ विविध प्रकल्पांची संख्या आहे. या पैकी लोकसहभागातून ९६१ प्रकल्पातील तर २१७ प्रकल्पातील शासकीय यंत्रनेद्वारे गाळ उपसण्याची मोहीम राबविण्यात आली. लोकसहभाग व शासकीय यंत्रणांच्या माध्यमातून ११६३ प्रकल्पातून १ कोटी ६४ लाख ३७ हजार ५२१ घनमीटर गाळ काढण्यात आला त्यात लोकसहभागातून केलेल्या कामाचे शासकीय मुल्य ९८ कोटी १४ लाख होते. याद्वारे १ कोटी ३६ लाख ३० हजार ९०५ घनमिटर गाळ वाढण्यात आला.जलयुक्त शिवार अभियान या योजनेचे महत्व सर्वसामाण्य मानसांना पटवून दिल्यामुळे या योजनेस उदंड असा लोकसहभाग मिळाला, या योजनेते गांभिर्य लक्षात घेवून राज्य शासनाने या योजनेला महत्व दिले.
  दिवसेंदिवस पर्जन्यवृष्टी कमी होतचालल्याने नद्या नाल्यांचे अस्तीत्व संपूष्ठात येऊ लागले होते या नद्या नाल्यांना पुन्हा प्रवाहीत करणे त्यांचे पुर्नरूजिवन करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला यामध्ये नद्या नाल्यांचे खोलीकरण बरोबरच ठिकठिकाणी माती व सिमेंट बंधारे उभारण्यामुळे ओसाड झालेल्या नद्या नाले पाण्याचा साठ्यामुळे भरभरून वाहू लागले आहेत या उपक्रमामुळे जमीनीतील पाणिसाठा वाढल्यास मोठी मदत होत आहे.
  जलयुक्त शिवार योजनेच्या पाहिल्या टप्यातील कामासाठी राज्यशासनाने सुमारे एक हजार कोटी रूपयाची तरतुद केली आहे. तर लोकसहभागातून २३५ कोटी रूपयाचा निधी उभा राहिला जलयुक्त शिवार योजना या महत्वकांक्षी प्रकल्पाद्वारे झालेल्या कामांचे यश लक्षात घेवून राजस्थानच्या मुख्यमंत्री श्रीमती वसुंधराराजे यांनी वाळवंटी प्रदेश म्हणून ओळखल्या जाणा-या राजस्थानला सुजलाम सुफलाम बनविण्यासाठी महाराष्ट्रराज्यातील जलयुक्त शिवार योजना राजस्थान राज्यात राबविण्याच्या निर्णय घेतला आहे. राजस्थानमध्ये जलयुक्त शिवार योजना राबविण्यासाठी राजस्थानचे उच्चस्तरिय अभ्यास मंडळाने महाराष्ट्र राज्यात येऊन थेट ना.पंकजा मुंडे यांची भेट घेतली आगामी काळात ना. पंकजा मुंडे यांची जलयुक्त शिवार योजना देशासाठी आदर्श ठरणार असल्याचे हे संकेतच आहेत.
  राज्याच्या ग्रामीण विकास मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांच्या कल्पनेतून साकार होत असलेली जलयुक्त शिवार योजना जलक्रांती कडे घेवून जाणारी ठरली आहे. पहिल्या टप्यात पुर्ण केलेल्या कामोच यश भरभरून वाहणा-या नद्या-नाले बंधा-याद्वारे दिसू लागले आहे. जलयुक्त शिवार ही योजना जलक्रांतीच्या दिशेने घौडदौड करित आहे. या प्रकल्पामुळे महाराष्ट्र राज्याचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांचे सुजलाम सुफलाम महाराष्ट्र आणि वसंतराव नाईकांचे हरित क्रांतींचे स्वप्न साकार करण्यास हातभार लावणारी ठरू लागली आहे यात शंकाच नाही.

  प्रा.डॉ.नामदेव सानप
  ९४२१५७३९३३

 • ग्रामविकास मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांच्या कार्याचा आढावा घेणारा विशेषांक

  ग्रामविकास मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांच्या कार्याचा आढावा घेणारा विशेषांक

  lokasha-m-3lokasha-m-4lokasha-m-6

 • 610281d1316162994-calling-all-team-bhp-farmers-farming-thread-img_4234

  शेतकऱ्यांना आधार ‘जलयुक्त’चा

  नेरळ : पावसाने दडी मारल्याने बळीराजा संकटात सापडला आहे. मात्र ज्या ठिकाणी पावसाचे पाणी जमिनीत मुरून राहण्यासाठी बांधलेले बंधारे काही प्रमाणात त्या त्या भागातील शेतकरीवर्गासाठी मदतगार ठरत आहेत. जलयुक्त शिवारअंतर्गत खोदलेले मातीचे बंधारे यांचा फायदा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात झाल्याने अनेक ठिकाणी शेतीची कामे उरकली जात आहेत.

  कर्जत तालुक्यात जलयुक्त शिवारसाठी तीन गावे निवडण्यात आली होती.त्यात पाच वर्षांमध्ये जामरुंग या टेंबरे ग्रामपंचायतच्या गावामध्ये पावणेतीन कोटी खर्च करून हा परिसर पाण्याच्या दृष्टीने सक्षम करण्याचा प्रयत्न कृषी, पाटबंधारे, सामाजिक वनीकरण, लघुपाटबंधारे, महसूल, वन या विभागांच्या मदतीने केला जाणार आहे. उन्हाळ्यात या परिसरात पाणीटंचाई असते. ओलमण या दुसऱ्या गावामध्ये दोन कोटी पस्तीस लाख रु पये खर्च करण्यात येणार असून त्या गावामध्ये फेब्रुवारी महिन्यापासून पाणीटंचाईची परिस्थिती उद्भवते. तर राजनाला कालव्याच्या भागात असून देखील मांडवणे या गावाच्या शिवारात पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवते. म्हणून हा परिसर पाणीदृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न जलयुक्त शिवारअंतर्गत केला जात आहे. मांडवणेत आतापर्यंत आठ मातीचे बंधारे बांधून पूर्ण झाले आहेत. तर जामरु ंगमध्ये नऊ ठिकाणी मातीचे बंधारे खोदण्यात आले असून डोंगर भागात पाणी अडवून जमिनीची भूजल क्षमता वाढविण्यासाठी डोंगररांगांमध्ये लूज बोर्डर बनविण्यात आले आहेत. ओलमण भागामध्ये वनविभागाने ३००० जलशोधक खंदक खोदून जमिनीची भूजल क्षमता वाढविण्याचा प्रयत्न केला आहे. जलयुक्त शिवारअंतर्गत भूसंधारण आणि जलसंधारण अंतर्गत करण्यात आलेल्या कामांचा फायदा जामरु ंग, मांडवणे आणि ओलमणमधील शेतकऱ्यांना होत आहे. सध्या पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतली असताना जलयुक्त शिवारअंतर्गत कामे सुरू असलेल्या गावांमध्ये शेतीची कामे करताना शेतकरी दिसत आहे. ज्या ठिकाणी मातीचे बांध खोदण्यात आले आहेत, तेथे भाताची रोपे आजही हिरवीगार आहेत. तालुक्यातील अन्य भागात मात्र भाताची रोपे सुकून गेल्याचे दिसून येत आहे.

 • smart village

  गावे होणार ‘स्मार्ट’

  म. टा. प्रतिनिधी, मुंबई
  पाण्याचे महत्त्व लक्षात घेऊन पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब अडविण्यासाठी यापूर्वीच्या अनेक जलसंधारणाच्या योजनांना एकत्र करून जलयुक्त शिवार योजना आणण्यात आली. त्याच धर्तीवर इको व्हिलेजची कल्पना अधिक विस्तारीत करून माहिती व तंत्रज्ञान आणि अपारंपरिक उर्जा निर्मितीला अधिक महत्त्व देणारी स्मार्ट व्हिलेजची योजना राज्य सरकार महिन्याभरात आणार आहे.

  ग्रामविकास व महिला बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी बुधवारी ही माहिती दिली. ग्रामविकासाच्या अनेक योजना सध्या असल्या तरी त्यातील गावाच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाच्या असलेल्या सर्व योजनांना स्मार्ट व्हिलेज योजनेच्या एका छत्राखाली आणण्याचा विचार आहे. नव्या योजनेबाबत अनेक बैठका झाल्या. त्याबाबतचा रितसर प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीपुढे मान्यतेसाठी आणला जाईल. पावसाळी अधिवेशनानंतर साधारणतः महिनाभरात नवीन योजना कार्यान्वित करण्याचा आपला संकल्प आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

 • pankaja_t

  आई, तूही भ्रष्ट राजकारणी ?

  मुंबई : चिक्की घोटाळ््याबाबत प्रसिद्धी माध्यमात वरचेवर बातम्या येऊ लागल्या तेव्हा ‘आई, तूही भ्रष्ट राजकारणी (करप्ट पॉलिटीशियन) झालीस का,’ असा प्रश्न माझ्या मुलाने विचारल्याने मी कमालीची अस्वस्थ झाले. सारे काही समजून सांगितल्यानंतर त्याचे समाधान झाले. मात्र अशा आरोपांचा किती गंभीर परिणाम होऊ शकतो त्याची माझ्यातील आईला जाणीव झाली, असे भावनिक उदगार महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा करताना काढले.

  मुलाने मला हा प्रश्न केल्यावर मी त्याला रेट कॉन्ट्रॅक्ट, ई-टेंडरिंग वगैरे बाबी माझ्यापरीने समजून सांगितल्या. मला माझ्या आईनेही तू नीट अभ्यास न करता घाईगर्दीत निर्णय घेतला का, असे विचारले. प्रत्येक आईला आपले मूल कायम लहान वाटते. तिलाही मी माझा निर्णय समजून सांगितला. त्यानंतर माझे कुटुंबीय माझ्या पाठीशी उभे राहिले व मला लढण्याचे मानसिक बळ लाभले, असे पंकजा म्हणाल्या.

  गोपीनाथ मुंडे यांनी विरोधी पक्षनेते असताना शरद पवार यांच्यावर केलेल्या राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाच्या आरोपांशी चिक्की घोटाळ््याबाबत केलेल्या वैयक्तिक आरोपांची तुलना करू नका. मुंडे यांच्या आरोपांकरिता त्यांच्याकडे सबळ पुरावे होते.

  शिवाय हे आरोप करून सत्तेवर आल्यावरही त्यांची राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाविरोधातील लढाई सुरू राहिली होती. त्यामुळे कृपया या दोन गोष्टींची तुलना करू नका, असे त्या म्हणाल्या. मागील सरकारने जलयुक्त शिवार योजनेत बांधलेल्या सिमेंट बंधाऱ्याची कामे असमाधानकारक असल्याच्या तक्रारी असल्याने त्याची चौकशी करण्याचे आदेश दिल्याचे मुंडे यांनी सांगितले.

 • Untitled-1

  चिक्कीत माती नाही, पंकजांना दिलासा

  मटा ऑनलाइन वृत्त । अहमदनगर

  चिक्की घोटाळ्याच्या आरोपांनी घेरलेल्या राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. ज्या चिक्कीवरून सध्या ‘महाभारत’ सुरू आहे ती चिक्की चांगल्या दर्जाची असल्याचा निर्वाळा चिक्कीची तपासणी करणाऱ्या प्रयोगशाळेने दिला आहे.

  जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये पुरवण्यात येणारी चिक्की निकृष्ट दर्जाची आहे. त्यात माती आहे, अशी तक्रार अहमदनगरच्या जिल्हा परिषद अध्यक्षा मंजुषा गुंड यांनी १७ जून रोजी महिला व बालकल्याण मंत्रालयाकडे केली होती. त्यानंतर याप्रकरणी झालेल्या चौकशीतून चिक्कीचे कंत्राट निविदा न काढता पंकजा यांच्या खात्याने सिंधुदुर्गातील सूर्यकांता सहकारी महिला संस्थेला दिल्याची माहिती पुढे आली. त्यावरून विरोधकांनी पंकजा यांनी चांगलेच घेरले. मात्र, हे कंत्राट नियमांच्या चौकटीत राहूनच देण्यात आले आहे. चिक्कीचा दर्जाही उत्तम आहे, असा दावा करत पंकजा यांनी विरोधकांचे सर्व आरोप फेटाळून लावले होते. या पार्श्वभूमीवर चिक्कीला क्लीनचीट देणारा अहवाल आता प्राप्त झाल्याने पंकजा यांचा चिक्कीच्या दर्जाबाबतचा दावा खरा ठरला आहे.

  मिळालेल्या माहितीनुसार, अहमदनगरमध्ये जिल्हा परिषद शाळांमध्ये पुरवण्यात आलेली सर्व चिक्की जप्त करून तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आली होती. या प्रयोगशाळेने आपला अहवाल दिला असून चिक्की खाण्यायोग्य आहे. त्यात मातीचा जराही अंश नसल्याचा निर्वाळा प्रयोगशाळेने दिला आहे.

  दरम्यान, चिक्कीला क्लीनचीट मिळाली असली तरी ही चिक्की तूर्त शाळांमध्ये वाटली जाणार नाही, असे जिल्हा परिषद अध्यक्षा मंजुषा गुंड आणि उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांनी स्पष्ट केले.

 • pankaja

  चिक्की घोटाळय़ाचे कारस्थान मोडून काढेन : पंकजा मुंडे

  ‘माझ्या विरोधात चिक्की घोटाळ्याचे रचलेले कारस्थान मी मोडून काढणार आहे’, असा विश्वास राज्याच्या महिला आणि बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला. लंडनहून मुंबईत परतताच विमानतळावर प्रसार माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी मुंडे यांनी चिक्की घोटाळ्याचा आरोप बिनबुडाचा असल्याचे म्हटले. पंकजा मुंडे यांनी सरकारी नियम डावलून २०६ कोटी रुपयांच्या खरेदीला दिलेल्या मान्यतेमुळे त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप होत आहे.

  पंकजा मुंडे यांचे मंगळवारी भल्या पहाटे मुंबई विमानतळावर आगमन झाले. त्यावेळी त्यांच्या स्वागतासाठी मुंबई विमानतळावर बीड, परळी या ठिकाणाहून आलेल्या असंख्य कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. मुंडे यांचे आगमम होताच कार्यकर्त्यांनी त्यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली. पंकजा यांची नाहक बदनामी करण्यामागे धनंजय मुंडे यांचा हात असल्याचा आरोप उपस्थित असलेल्या काही कार्यकर्त्यांनी केला. यावेळी मुंडे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधत, माझ्या विरोधात चिक्की घोटाळ्याचे रचलेले कारस्थान मी मोडून काढणार त्यासाठी मला केवळ तुमचा आशीर्वाद हवा आहे, असे भावनिक आवाहन मुंडे यांनी केले.

 • TNAIMAGE50793Pune_Yashda_Pankaja

  जुन्या जलस्त्रोतांच्या सुधारणेसाठी स्वतंत्र निधीची तरतूद करणार – जलसंधारण मंत्री पंकजा मुंडे

  पुणे : शिवकालीन साठवण तलाव, पाझर तलाव, माती नाला बांध अशा जुन्या जलस्त्रोतांच्या सुधारणेसाठी व दुरुस्तीसाठी स्वतंत्र तरतूद करण्यात येईल, असे प्रतिपादन जलसंधारण व ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी येथे केले.

  यशदा येथे वसुंधरा पाणलोट विकास यंत्रणेच्या विद्यमाने नदी पुनरुज्जीवन कार्यक्रमाच्या एक दिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन जलसंधारण मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते झाले. यावेळी त्या बोलत होत्या. जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे, जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह राणा, जलसंधारण सचिव प्रभाकर देशमुख, कृषी आयुक्त विकास देशमुख, श्री. पाशा पटेल आदी उपस्थित होते.

  पूर्वी जुन्या जलस्त्रोतांच्या दुरुस्तीसाठी निधी दिला जात नसे. तथापि जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जलस्त्रोतांचे बळकटीकरण व्हावे व गावा नजीकच पाणी उपलब्ध होत असेल तर या दुरुस्ती कामांना स्वतंत्र निधी दिला जाईल, असे स्पष्ट करून पंकजा मुंडे म्हणाल्या की, `जलयुक्त शिवार बाबत जनतेत जागरुकता व विश्वासार्हता वाढली आहे. बीड सारख्या जिल्ह्यात या अभियानांतर्गत लोकसहभागातून सुमारे दहा कोटी रुपयांचा भरघोस निधी उभारला गेला, हे उदाहरण म्हणजे जलयुक्त शिवार हे अभियान केवळ शासनाचा कार्यक्रम नसून या अभियानाला लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त झाल्याचे द्योतक आहे. एप्रिल महिन्यापासून या अभियानाला प्रारंभ झाला. आता शेवटच्या टप्प्यात उर्वरित अपूर्ण कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्यासाठी अधिकारी वर्गाने दक्षता घ्यावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

  जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे म्हणाले की, `पावसाचे पाणी जमिनीत मोठ्या प्रमाणात जिरवणे हे मोठे आव्हान आहे. भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी तसेच सांडपाण्याचा पुनर्वापर यासाठी कमीत कमी खर्चातील कोणत्या उपाययोजना राबविता येतील याबाबत या कार्यशाळेतील प्रतिनिधींनी सूचना द्याव्यात. त्यावर शासन जरूर ती उपयुक्त कार्यवाही करेल असे स्पष्ट केले.

  `दिल के करीब` जलयुक्त शिवार

  महाराष्ट्र राज्यात 37 दिवसात मी 17 जिल्ह्यांचा दौरा केला. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सुरु असलेली कामे पाहिली. लोकांचा उस्फूर्त सहभाग आणि जनता केवळ शासनाच्या मदतीवर अवलंबून न राहता पाण्याच्या उपलब्धतेसाठी स्वतःचे पैसे खर्च करते. केवळ पैसाच नाहीतर स्वतः गावकरी काम करीत आहेत. हे सर्व राज्यभर मी चित्र पाहिले आणि जलयुक्त शिवार ही योजना माझ्या दिल के करीब झाली, असे गौरवोद्गार व्यक्त करून जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह राणा म्हणाले की, `जलसुरक्षा कायदा करण्याबाबतचा मसुदा मी राज्य शासनास सादर केला आहे. याचबरोबर महाराष्ट्र शासनाने नदी नीती धोरण लवकर जाहीर करावे अशी माझी आग्रही मागणी आहे. जलयुक्त शिवार अभियानामुळे दुष्काळमुक्ती बरोबरच पाण्याची स्वयंपूर्णता निश्चित प्राप्त होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

  जलयुक्त शिवार 51 हजारांवर कामे पूर्ण

  प्रारंभी जलसंधारण सचिव प्रभाकर देशमुख यांनी महाराष्ट्रात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत 70 हजार कामे सुरु असल्याचे सांगून आत्तापर्यंत 51 हजार 500 कामे पूर्ण झाली आहेत. ज्या जिल्ह्यांनी नदी रुंदीकरण व खोलीकरण कामे लोकसहभागातून पूर्ण केली आहेत त्या जिल्ह्यांना शासनामार्फत साखळी सिमेंट नाला बांध बांधून देण्यात येतील. नदी चिंतन शिबीर ही संकल्पना धरून या कार्यशाळेच आयोजन केले असून जलतज्ज्ञ, स्वयंसेवी संस्था यांच्याकडून आलेल्या विविध सूचनांची नोंद घेऊन याबाबत जलयुक्त शिवार अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी त्यांचा निश्चित विचार केला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

  प्रास्ताविकात कृषी आयुक्त विकास देशमुख म्हणाले की, `पाणी अडविणे व जिरविणे यासाठी एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रम महत्त्वपूर्ण आहे. राज्यात ११७० पाणलोट प्रकल्प मंजूर असून ६२९१ आराखडे तयार करण्यात आले आहेत. यामुळे 49 लक्ष हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येण्यास मदत होणार आहे.

  कार्यशाळेस विजय परांजपे, उस्मानाबादचे जिल्हाधिकारी प्रशांत नारनवरे, लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिनकर जगदाळे, जलबिरादरीचे सदस्य तसेच विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

 • TNAIMAGE63061Latur award

  त्यागमूर्ती प्रयाग अक्का कराड समर्पित जीवनगौरव पुरस्कार कार्यक्रम संपन्न

  लातूर : विश्वशांती केंद्र, माईर्स एमआयटी, पुणेतर्फे पूर्णब्रम्हयोगिनी त्यागमूर्ती प्रयाग अक्का कराड यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त माईर्स एमआयटीच्या एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालय, अंबाजोगाई रोड, लातूर येथे विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर आणि पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते पूर्णब्रम्ह योगिनी त्यागमूर्ती प्रयाग अक्का कराड समर्पित जीवनगौरव पुरस्कार डॉ. कॅथरिना फेलाशे (रोम-इटली), स्वामी राधिकानंद सरस्वती (पुणे), श्रीमती सुभद्राराजे नाईक-निंबाळकर (फलटण, जि. सातारा), ब्रम्हकुमारी पद्माताई राणे (पुणे), श्रीमती गोदावरीताई मुंडे (गंगाखेड, परभणी) यांना आणि ज्ञानेशवरीचे गाढे अभ्यासक डॉ. रामचंद्र श्रीनिवास मोरवंचीकर (औरंगाबाद) यांना विशेष समर्पित जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात प्रदान करण्यात आले.

  पूर्णब्रम्ह योगिनी त्यागमूर्ती प्रयाग अक्का कराड समर्पित जीवनगौरव पुरस्काराचे स्वरुप सन्मान चिन्ह, स्मृतिचिन्ह, सुवर्णपदक व रोख ११ हजार रुपये असे होते. यावेळी माईर्स एमआयटीचे अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड, जिल्हाधिकारी पांडुरंग पोले, पोलीस अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी दिनकर जगदाळे, माईर्स एमआयटीचे उपाध्यक्ष राहूल कराड, रमेश अप्पा कराड, माईर्स एमआयटीचे कार्यकारी संचालक डॉ. संजय उपाध्ये आदी उपस्थित होते.

Page 12 of 31« First...1011121314...2030...Last »