• post image new

  मुंडेंचा बालेकिल्ला पंकजानी राखला, भाजपाचा षटकार क्षीरसागारनी रोखला

  मुंडेंचा बालेकिल्ला पंकजानी राखला, भाजपाचा षटकार  क्षीरसागारनी  रोखला

 • post image2

  कोणत्याही स्थितीत राष्ट्रवादी सोबत जाणार नाही

  कोणत्याही स्थितीत राष्ट्रवादी सोबत जाणार नाही

 • post image02

  भाजपच्या जागा कमी आल्या तर पंकजाताईना मुख्यमंत्री पदाची संधी

  भाजपच्या जागा कमी आल्या तर पंकजाताईना मुख्यमंत्री पदाची संधी

 • विराट सभेने मुंडे बहिणींच्या विजयावर शिक्कामोर्तब

  विराट सभेने मुंडे बहिणींच्या विजयावर शिक्कामोर्तब

 • pankaja new

  मुंडेंचे रेल्वेचे स्वप्न पूर्ण करतो – मोदी

  मुंडेंचे रेल्वेचे स्वप्न पूर्ण करतो – मोदी

 • post image001

  महाराष्ट्राला गुजरातच्या पुढे नेऊ

  महाराष्ट्राला गुजरातच्या पुढे नेऊ

 • post image_new

  मुंडे असते तर मला महाराष्ट्रात प्रचाराला यावे लागले नसते – मोदी

  मुंडे असते तर मला महाराष्ट्रात प्रचाराला यावे लागले नसते – मोदी

 • post image2222

  ‘संघर्षा’ चे फलित

  ‘संघर्षा’ चे फलित

 • post image

  विधानसभा निवडणुकीचे नेतृत्व पंकजाकडेच

  विधानसभा निवडणुकीचे नेतृत्व पंकजाकडेच

 • post image_last

  ‘पुन्हा संघर्ष यात्रा’चा समारोप

  भाजपचे दिवंगत ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे-पालवे यांनी सुरू केलेल्या ‘पुन्हा संघर्ष यात्रा’ उपक्रमाचा समारोप उद्या गुरुवारी (ता. १८) दुपारी १ वाजता चौंडी (ता. जामखेड) येथे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत होणार आहे.

  कै गोपीनाथ मुंडे यांनी १९९५मध्ये तत्कालीन काँग्रेस सरकारच्या कारभाराविरुद्ध संघर्ष यात्रा काढली होती. या यात्रेस महाराष्ट्रातील जनतेकडून भरभरून प्रतिसाद मिळाला व त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव होऊन राज्यात पहिल्यांदा भाजप-शिवसेना युतीची सत्ता आली होती. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपला केंद्रात देदीप्यमान यश मिळून स्वःताकदीचे भाजपचे सरकार केंद्रात आले आहे. आता राज्यातही युतीचे सरकार यावे यासाठी मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे-पालवे यांनी ‘पुन्हा संघर्ष यात्रा’ सुरू केली आहे. दोन टप्प्यात सुमारे साडेतीन हजार किलोमीटरचा प्रवास करून राज्यभर त्यांनी जनजागृती केली आहे. राज्यातील दोन्ही काँग्रेसच्या सरकारच्या कारभारावर जोरदार शाब्दीक हल्ला करताना राज्यातील आगामी युतीचे सरकार जनसेवेसाठी वचनबद्ध असल्याचाही दावा केला आहे.

  उद्या सकाळी ही यात्रा जामखेड रस्त्याने चौंडीकडे जाणार आहे. चौंडीच्या समारोप सभेस भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा तसेच प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस व अन्य मान्यवर नेते उपस्थित राहणार आहेत.

  तत्पूर्वी, शेतकऱ्यांना सोलणाऱ्या सावकारांच्या जाचातून शेतकऱ्यांची सुटका करू, अशी भाषा करणाऱ्या दोन्ही काँग्रेसच्या सरकारने प्रत्यक्षात शेतकरी व ऊसतोड मजुरांनाच सोलण्याचे काम केले असल्याने या सरकारला पायउतार करण्यासाठी मी देईल त्या उमेदवाराला निवडून द्या व गोपीनाथ मुंडेंचा स्वाभिमान जागृत ठेवा, असे आवाहन पंकजा मुंडे यांनी पार्थर्डीतील सभेत केले.

  आव्हाड, गर्जे भाजपमध्ये

  माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, डॉ. मृत्युंजय गर्जे, सोमनाथ खेडकर, भगवान आव्हाड, संजय बडे व प्रतिक खेडकर, मुक्ताजी भगत यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तर मनसे व राष्ट्रवादीचे पंचायत समिती सदस्य देविदास खेडकर, संभाजी पालवे यांनी मुंडे यांचा स्टेजवर येत सत्कार केला.

  सवाई बेटी संतापली

  गोपीनाथ मुंडे यांच्या सभेपेक्षाही बुधवारच्या पंकजा यांच्या सभेस अलोट गर्दी जमा झाल्याने बापसे बेटी सवाई, अशी चर्चा उपस्थितांमधून होत होती. दरम्यान, व्यासपीठावर मोठी गर्दी झाल्याने पंकजा मुंडे चांगल्याच संतापल्या होत्या.

Page 21 of 31« First...10...1920212223...30...Last »