• post image2000

  तुम्ही जिल्हा सांभाळा, मी राज्य बघते !

  तुम्ही जिल्हा सांभाळा, मी राज्य बघते !

 • post image0000

  मस्ती चढलेल्या सरकारला खाली खेचण्यासाठी संघर्ष यात्रा- पंकजा मुंडे

  नियतीशी लढा देण्यासाठी, लोकनेता होण्यासाठी ही संघर्ष यात्रा आहे. लाल दिव्याची गाडी घेण्यासाठी आणि मंत्रिपद घेण्यासाठी ही संघर्ष यात्रा नसून मस्ती चढलेल्या सरकारला खाली खेचण्यासाठी ही संघर्ष यात्रा आहे, असे प्रतिपादन भाजपाच्या नेत्या पंकजा पालवे-मुंडे यांनी केले.
  सावित्रीबाई फुले यांच्या जन्मगावी नायगाव (ता खंडाळा) येथील जाहीर सभेत त्या बोलत होत्या. यावेळी भीमराव तापकीर, दिलीप येळगावकर, डी एम बावळेकर, सदाशिव सपकाळ, मकरंद देशपांडे आदी उपस्थित होते. यावेळी शिवसेनेचे माजी जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम जाधव यांनी भाजपात प्रवेश केला.
  या सरकारने खूप मोठे घोटाळे केले आहेत. या सरकारला धडा शिकविण्यासाठी व सत्तेची मस्ती घालविण्यासाठी मी लढा देणार आहे. सामान्य माणूस नरेंद्र मोदी आज पंतप्रधान झाले आहेत. आता सर्वसामान्यांचे दिवस आले आहेत. सावित्रीबाई फुलेंच्या कार्याला वंदन करून मी हे काम हाती घेतले आहे. नियतीशी मी लढा देणार आहे. गोपीनाथ मुंडे यांनी सर्वसामान्य कुटुबांतून येऊन प्रस्थापितांना सत्तेतून घालविण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला. माझे वडील गेल्यानंतर सामान्य माणसानी मला ताकद दिली म्हणून मी लढणार आहे. नुसते लोकसेवक बोर्ड लावून लोकनेता होता येत नाही. लोकांमध्ये मिसळून त्याची सुख-दु:खे समजून घेतल्याशिवाय लोकनेता होता येत नाही. म्हणून माझा हा संघर्ष आहे. यांना वाटते सत्ता आणि पशाशिवाय प्रगती करता येत नाही. देशात आणि राज्यात प्रगतीसाठी एकच सरकार आणायचे आहे. या सरकारला धडा शिकविण्यासाठी माझा लढा आहे. ही क्रांतिज्योत आता पेटल्याशिवाय राहणार नाही. काहीही झाले तरी आपल्याला हे सरकार घालवायचे आहे, असेही त्यांनी आपल्या भाषणात सांगितले. जिल्हाध्यक्ष भरत पाटील यांनी प्रास्ताविक केले.

 • post image001

  राज्यात सध्या मोदी लाट नसल्याचा भाजप नेत्यांचा दावा, आता पंकजा मुंडे लाट

 • IMG-20140912-WA004

  राज्याची मुख्यमंत्री महिला झालेली आवडेल

 • राष्ट्रवादी नेतृत्वाकडून माळी समाजाच्या जमिनी बिल्डरांच्या घशात – पंकजा मुंडे

  कष्टकरी माळी समाजाच्या पुणे जिल्हय़ातील बहुतांश जमिनी बिल्डरांच्या घशात घालण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेस नेतृत्वाने केले, असा घणाघाती आरोप करून विकासापासून दुर्लक्षित फुले दाम्पत्याचे जन्मगाव आरणला तीर्थक्षेत्र अ दर्जा देऊ, अशी घोषणा आमदार पंकजा मुंडे यांनी केली. संघर्षयात्रा राज्यात सत्तापरिवर्तन घडवेल, असा विश्वासही व्यक्त केला.
  सावता परिषदेच्या वतीने येथे माळी समाजपरिवर्तन मेळावा शनिवारी पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत झाला. आमदार विनायक मेटे, माजी आमदार अशोक मानकर, अतुल सावे, भास्कर आंबेकर, रमेश आडसकर व संयोजक परिषदेचे कल्याण आखाडे उपस्थित होते. पंकजा मुंडे म्हणाल्या की, सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले यांनी समाजात परिवर्तन घडविण्यासाठी आधी स्वतमध्ये परिवर्तन केले. त्यांच्या पुण्याईनेच आपण आज लोकांसमोर उभे आहोत. मात्र, महापुरुषांना जातीपुरते मर्यादित करणे चुकीचे आहे. जात जन्माने मिळते. आपला जातीवर विश्वास असला, तरी जाती-भेद व जातीयवादावर नाही, असे मुंडे यांनी स्पष्ट केले.
  दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी माळी, धनगर, वंजारा, मराठा या समाज समूहांना भारतीय जनता पक्षाशी जोडले. त्यामुळे भाजप सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचला. राज्यात सत्तापरिवर्तनाचे त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण स्वतचे दुख बाजूला ठेवून लढाईत उतरलो आहोत. माळी समाज कष्टकरी आहे. मात्र, पुणे जिल्हय़ातील या समाजाच्या बहुतांशी जमिनी बिल्डरच्या घशात घालण्याचे काम राष्ट्रवादी नेतृत्वाने केले, असा आरोप त्यांनी केला. मेळाव्यास राज्यभरातून लोक उपस्थित होते.

 • post image9-9

  लोकसभेसारखे बळ दया

 • post image000

  राज्यात सत्ता परिवर्तन हीच गोपीनाथ मुंडेंना खरी श्रद्धांजली

  औरंगाबाद : गोपीनाथ मुंडे यांनी सत्तेसाठी कधीही संघर्ष केला नाही. त्यांना चिंता होती गोरगरीब जनतेची. त्यांच्याच विचारांना पुढे घेऊन जनतेच्या विकासासाठी पंकजा मुंडे यांनी पुन्हा संघर्ष यात्रा काढली. राज्यात सत्ता परिवर्तन हीच गोपीनाथ मुंडे यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे प्रतिपादन केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी मंगळवारी (ता.2) केले.

  सिंदखेडराजा येथून ता. 28 ऑगस्टला आमदार पंकजा मुंडे-पालवे यांच्या संघर्ष यात्रेला प्रारंभ झाला. यात्रेच्या पहिल्या टप्प्याचा मंगळवारी औरंगाबादेतील जयभवानीनगर येथे समारोप झाला. या वेळी स्मृती इराणी बोलत होत्या.

  इराणी म्हणाल्या, की माझ्या राजकीय कारकिर्दीची सुरवात गोपीनाथ मुंडे यांच्यामुळेच झाली. मी टी.व्ही. सिरीअलमध्ये काम करायचे आणि त्यातून काही उरलेले पैसे गोरगरिबांना द्यायचे. त्यांच्या मार्गदर्शनानेच मी राजकारणात आले. निवडणुका हरल्यानंतर विरोधकांकडे भरपूर रिकामा वेळ असल्याने आता शिक्षक दिनाच्या कार्यक्रमासंदर्भात ते राजकारण करीत आहेत, असा टोला केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी कॉंग्रेससह विरोधकांना लगावला.

  आता लढणारच : पंकजा मुंडे
  गोपीनाथ मुंडे यांच्या अंत्यविधीला जो जनाधार उसळला होता, त्यावरून त्यांची महाराष्ट्रातील ताकद आणि बाबांनी काय कमविले हे कळले. या यात्रेत जनतेच्या डोळ्यांत स्वप्न, भावना, बदल हवाय असे स्पष्ट दिसत होते. पंधरा वर्षांत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सरकारने जनतेचे भले करण्याऐवजी स्वत:च्या तिजोऱ्या भरल्या. जनतेला लुटणाऱ्या या जुलमी सरकारला घरी पाठवू, त्यासाठी सर्वांनी महायुती सत्तेत आणण्यासाठी शपथ घ्यायची आहे, असे आवाहनही पंकजा यांनी या वेळी केले.

 • पंकजांचा राष्ट्रवादीला हाबाडा

  बीडचे रमेश आडसकर यांचा भाजपमध्ये प्रवेश; तीन मतदारसंघांमध्ये प्रभाव पडण्याची शक्यता.

  काही दिवसांपासून नाराज असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि बीड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रमेश आडसकर यांनी मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला. केज, माजलगाव आणि परळी विधानसभा मतदारसंघांमध्ये चांगले नेटवर्किंग असणाऱ्या आडसकर यांच्या प्रवेशामुळे बीड जिल्ह्यात भाजपला चांगलाच फायदा होणार आहे. आमदार प्रकाश सोळंके यांच्या विरोधात माजलगाव मतदारसंघातून उमेदवारी मिळणार असल्यामुळेच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

  विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीन बीड जिल्ह्यातील राजकीय उलथापालथींना सुरुवात झाली आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर आमदार पंकजा मुंडे-पालवे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मातब्बर नेत्यांशी कशा पद्धतीने लढा देतात, याकडे राज्याचे लक्ष आहे. मात्र, पंकजा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला पहिला हाबाडा दिला. जिल्ह्यातील मातब्बर घराणे अशी ओळख असलेल्या आडसकर कुटुंबातील रमेश आडसकर यांनी मंगळवारी औरंगाबादेत प्रवेश केला.

  रमेश आडसकर यांनी २००९मध्ये गोपीनाथ मुंडे यांच्याविरोधात लोकसभेची निवडणूक लढविली होती.
  त्यावेळी आडसकर यांना चार लाखांहून अधिक मते मिळाली होती. मात्र, पाच वर्षांमध्ये पुलाखालून बरेच पाणी गेले. मुंडे यांच्याविरोधातील निवडणुकीनंतर विधान परिषदेतवर अन्य नेत्यांना संधी दिल्यामुळे आडसकर नाराज होते. लोकसभा निवडणुकीपासूनच ते मुंडे यांच्या संपर्कात असल्याचे वृत्त होते. मात्र, आडसकर यांनी त्याचे खंडन केले होते. मुंडे यांच्या निधनानंतर काही काळ त्यांचा भाजप प्रवेश लांबला होता. मात्र, अनेक वर्ष जिल्हा परिषदेच्या माध्यमातून काम केल्यानंतर विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी त्यांनी सुरू केली होती. केज मतदारसंघ राखीव असल्याने माजलगाव मतदारसंघातून ते प्रयत्नशील होते. माजलगावमध्ये भाजपकडून उमेदवारी मिळाल्यास विधानसभेत जाण्याचा प्रवास सुकर होऊ शकेल, या विचारातून त्यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

  या मतदार संघात वंजारा समाजाचे मतदान लक्षणीय आहे. तसेच, माजलगावमध्ये त्यांचे पाहुण्या रावळ्यांचे जाळेही आहे. त्यामुळेच आडसकर आणि सोळंके यांच्यामध्ये विधानसभेची निवडणूक चांगलीच रंगू शकते.

 • post-image.jpqqg

  महाराष्ट्रात सुराज्य आणायचेच : पंकजा मुंडे

  महाराष्ट्रात कॉंग्रेसने ५० वर्षे राज्य केले. परंतु, या काळात त्यांनी राज्याला अधोगतीकडे नेले. भ्रष्टाचारी कॉंग्रेसला कंटाळलेल्या जनतेने लोकसभेत भाजपाला स्पष्ट कौल दिला आणि केंद्रात सुराज्य आणले. विधानसभा निवडणुकीतही सत्ता परिवर्तन करून महाराष्ट्रात सुराज्य आणण्याचे मुंडे साहेबांचे स्वप्न होते. ते साकारण्यासाठी ही संघर्ष यात्रा आहे. त्यासाठी मला तुमची साथ हवी आहे, असे भावोद्‌गार आमदार पंकजा मुंडे यांनी येथे बोलताना काढले.

  राष्ट्रमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, अहल्यादेवी होळकर यांच्या प्रेरणेतुन मातृतीर्थ सिंदखेडराजा येथून आमदार पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वात निघालेली संघर्षयात्रा ३० ऑगस्ट रोजी सायंकाळी ७.३० वाजता मालेगाव येथे पोहोचली.

  यावेळी खासदार संजय धोत्रे, आमदार रणजित पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष सुरेश लुंगे, माजी आमदार विजय जाधव, आकाश पुंडकर, नरेंद्र गोेलेच्छा, डॉ. विवेक माने, अविनाश जोगदंड, ऍड. शंकरराव मगर, रत्नप्रभा घुगे, पंजाबराव घुगे, श्याम बढे, अजय राजुरकर, अनिल कांबळे, उध्दवराव राऊत, छाया पंकज देशमुख, मंगला धंदरे, शबाना ईमदाद, अन्नपूर्णा भुरकाडे, संजय देशमुख, सतीश माने, ज्ञानबा सावळे आदी मान्यवरांची विचारपीठावर उपस्थिती होती.

  यावेळी पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या की, ३ जून २०१४ रोजी मुंडे साहेब आपल्या सर्वांना सोडून गेले. त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम त्या दिवशी बीडला होणार होता. परंतु, दुर्दैवाने त्यांच्या अंत्ययात्रेत सहभागी व्हावे लागले तेव्हापासून माझ्या जीवनात संघर्षाला सुरुवात झाली आणि बाबांचे स्वप्न साकार करण्यासाठी सत्तापरिवर्तनाची लढाई लढण्यासाठी मी सिद्ध झाले . तुम्हाला शासनकर्ते बनविण्याची माझी इच्छा आहे. त्यासाठीच माझं दु:ख बाजूला ठेवून संघर्ष करण्याची माझी तयारी आहे. सर्वसामान्य, गोरगरिबांना समाजात मानाचे स्थान देण्यासाठी त्यांना न्याय देण्यासाठी माझे आयुष्य खर्ची घालण्याचे ठरविले आहे. राष्ट्रवादीने बाबांना चक्रव्युहात अडकवून त्यांना जिवंतपणी मरणयातना दिल्या. त्या राष्ट्रवादीला आता मुंडे साहेबांचा पुळका आला आहे, असा आरोपही त्यांनी केला.

 • post-image_01

  राष्ट्रवादीला जिल्ह्यातच घेरण्याची भाजपाकडून तयारी

  राष्ट्रवादीला जिल्ह्यातच घेरण्याची भाजपाकडून तयारी

Page 22 of 31« First...10...2021222324...30...Last »