• mla-news

  आ. पंकाजाताई पालवे यांच्यामुळे मिळाली परळीतील सांस्कृतिक चळवळीला नवी दिशा

  आ. पंकाजाताई पालवे यांच्यामुळे मिळाली परळीतील सांस्कृतिक चळवळीला नवी दिशा

 • mla-news02

  आ. पालवे यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप

  आ. पालवे यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप

 • ahmadnagar

  अहमदनगर : एल्गार-against-आघाडी-सरकार

  उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सत्तेची आणि पैशाची मस्ती आली आहे. जनताच ती मस्ती उतरवेल”, असं टीकास्त्र भाजप आमदार पंकजा मुंडे यांनी सोडलं. रविवारी (दि.२८) रोजी अहमदनगरमध्ये भाजपचा युवा निर्धार मेळावा पार पडला. यावेळी त्यांनी अजित पवारांवर टीकेचा भडिमार केला. भाजपच्या युवा प्रदेशाध्यक्षपदी पंकजा मुंडे यांची निवड झाल्यानंतर त्यांनी राज्यव्यापी दौऱ्याला सुरुवात केलीय. त्यांनी काल अहमदनगरमध्ये युवा निर्धार मेळावा घेतला. यावेळी पंकजा मुंडे यांनी अजित पवारांवर टीकास्त्र सोडलं. सोलापूर येथील अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्याचा जोरदार निषेध करत, त्यांना पैशाची आणि सत्तेची मस्ती चढल्याचा आरोप, पंकजा मुंडे यांनी केला आहे. एवढ्यावरच त्या थांबल्या नाहीत तर ती मस्ती उतरवण्याची ताकद भारतीय जनता पार्टीमध्ये असून ती मस्ती आम्ही उतरवणार असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. इतकंच नाही, तर नुकत्याच मराठवाड्यात झालेल्या जेलभरो आंदोलनानंतर, आता तुळजापूरला जाऊन तुळजाभवानीसमोर राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीविरोधात एल्गार करणार असल्याचंही, पंकजा मुंडे यांनी सांगितलं. महागाईने ग्रासलेल्या जनतेची सरकार चेष्टा करत असल्याचा आरोप, मुंडे यांनी यावेळी केला.

 • pune

  पुणे : एल्गार-against-आघाडी-सरकार

  आगामी निवडणुका जिंकण्यासाठी आपसातील मतभेद, हेवेदावे विसरून एकत्र या. मतांचे विभाजन करणाऱ्या पक्षाच्या मागे जाऊ नका. राज्यातील सरकारच्या विरोधात युवकांच्या मनात मशाल पेटली असून ती विधानसभेवर भगवा फडकवल्याशिवाय शांत होणार नाही, अशी घोषणा करत भारतीय जनता पक्षाच्या आमदार पंकजा पालवे-मुंडे यांनी शुक्रवारी आघाडी सरकारच्या विरोधात एल्गार केला. भाजयुमोतर्फे आघाडी सरकारच्या विरोधात क्रांतिदिनानिमित्त एल्गार मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले होते. पुण्यातील मेळाव्यात भाजयुमोचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार अनुराग ठाकूर, आमदार पंकजा पालवे यांची प्रमुख उपस्थिती होती. शहराध्यक्ष अनिल शिरोळे, आमदार भीमराव तापकीर, माधुरी मिसाळ, प्रदेश चिटणीस प्रा. मेधा कुलकर्णी, युवा मोर्चाचे प्रदेश चिटणीस सिद्धार्थ शिरोळे, शहराध्यक्ष गणेश घोष, नगरसेविका निलीमा खाडे यांचीही या वेळी उपस्थिती होती. भाजपसाठी देशात चांगले वातावरण आहे. निवडणुका जिंकायच्या असतील, तर आपापसातील मतभेद, पक्षांतर्गत वादविवाद आता दूर ठेवले पाहिजेत. मला सन्मान मिळाला नाही, मला खुर्ची दिली नाही, हे विचार आता सोडून द्या आणि निवडणुकीतील यशासाठीच झटून काम करा, असे आवाहन या वेळी बोलताना आमदार मुंडे यांनी केले. मतांचे विभाजन करणाऱ्या पक्षाच्या मागे गेल्यामुळेच आपला पराभव झाला. गेल्या लोकसभेत पुण्याची आपली हक्काची जागा आपल्याला गमवावी लागली, असेही त्या म्हणाल्या. जनतेचा हक्काचा पैसा राज्यातील सरकारने घोटाळ्यांमध्ये बुडवला आहे. गुन्हेगारीसह अनेक प्रश्न, समस्या वाढत आहेत. त्यामुळे आता युवकांनी सरकारला जाब विचारला पाहिजे, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले. देशात सुरू असलेल्या कोणत्याही घोटाळ्याचा जाब जनतेला द्यावा लागू नये, यासाठी काँग्रेसतर्फे देशात सातत्याने वाद निर्माण केले जात आहेत. देशातील महिला, जवान, शेतकरी यांचा केंद्रातील सरकारने अपमान केला आहे. या परिस्थितीत देशात भाजपचे रामराज्य आणण्याची जबाबदारी युवकांनी स्वीकारली पाहिजे, असे आवाहन खासदार ठाकूर यांनी केले. फक्त घोषणा करून निवडणुका जिंकता येणार नाहीत, तर प्रत्येक मतदान केंद्रनिहाय युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांचे संघटन करावे लागेल, असेही ते म्हणाले. मेळाव्याच्या प्रारंभी शहर भाजयुमोतर्फे दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

 • IMG-20130830-WA000

  सत्ता परिवर्तनासाठी सज्ज व्हा ! : पंकजाताई

  खर्डा येथे जाहीर सभा व विविध विकास कामांचे उद्घाटन

 • bipass_rasta

  परळीतील बायपास रस्ता विषयी जिल्हाधीकाऱ्याकडून आढावा

  परळीतील बायपास रस्ता विषयी जिल्हाधीकाऱ्याकडून आढावा

 • IMG-20130825-WA002

  मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमस्थळी भाजयुमोची तीव्र निदर्शने

  मुंबई येथे झालेल्या बलात्काराच्या निषेधार्थ भारतीय जनता युवा मोर्चातर्फे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी रविवारी निदर्शने करण्यात आली. मोर्चाच्या शहराध्यक्षा आमदार पंकजा मुंडे-पालवे यांच्यासह ७५ निदर्शकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. मुख्यमंत्री पुढील कार्यक्रमाला रवाना झाल्यावर या कार्यकर्त्यांना सोडून देण्यात आले.

  मुंबईतील वृत्तपत्र छायाचित्रकार युवतीवर बलात्कार झाल्याच्या घटनेने राज्यामध्ये खळबळ उडाली आहे. त्या पाश्र्वभूमीवर विविध कार्यक्रमांसाठी मुख्यमंत्री पुण्यात आले होते. यशदा येथे चव्हाण यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. पंकजा मुंडे-पालवे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या निदर्शनामध्ये मुख्यमंत्र्यांना घेराव घालण्याची योजना होती. मात्र, पोलिसांनी या परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. दुपारी दोन वाजल्यापासूनच विद्यापीठ उड्डाण पुलावरून बाणेरकडे जाणारा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. सरळ रस्ता बंद ठेवल्यामुळे वाहनचालकांना वळसा घालून येण्याचा मनस्ताप सहन करावा लागला आणि वाहतुकीच्या कोंडीमध्ये नागरिकांचे हाल झाले.

  पक्षाचे शहराध्यक्ष अनिल शिरोळे, आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, मोर्चाचे प्रदेश चिटणीस सिद्धार्थ शिरोळे, शहराध्यक्ष गणेश घोष यांच्यासह नगरसेवक आणि कार्यकर्ते या निदर्शनांमध्ये सहभागी झाले होते. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या विरोधामध्ये घोषणा देत महिलांना संरक्षण देण्यामध्ये अपयश आलेल्या सरकारने राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली.

 • आपला देश झाला कचऱ्याचा डबा

  पुणे – ‘लोकसंख्यावाढीमुळे आधुनिक साधनांचा वापरही वाढला. मात्र, त्यामुळे निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे व्यवस्थापन करण्याची सुविधा आपल्याकडे नाही. त्यामुळे आपला देश पाश्‍चिमात्य देशांतील वस्तूंच्या “कचऱ्याचा डबा’ झाला आहे,” अशी खंत आमदार पंकजा मुंडे-पालवे यांनी येथे व्यक्त केली.

  प्रभाग क्रमांक 37 मध्ये नगरसेविका मुक्ता टिळक व नगरसेवक हेमंत रासने यांच्या पुढाकाराने देशातील पहिला “सॅनिटरी नॅपकिन्स डिस्पोजर’ प्रकल्प सुरू झाला आहे. त्याचे उद्‌घाटन मुंडे यांच्या हस्ते झाले. या वेळी महापौर वैशाली बनकर, आमदार गिरीश बापट, माधुरी मिसाळ, भाजपचे शहराध्यक्ष अनिल शिरोळे, उपायुक्त सुरेश जगताप, विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालय प्रभाग समिती अध्यक्ष धनंजय जाधव आदी उपस्थित होते. याच प्रकारचा दुसरा प्रकल्प प्रभाग क्रमांक 21 मध्ये सुरू केला जाणार आहे. येथे सॅनिटरी नॅपकिन्सप्रमाणे “डायपर’ डिस्पोजर केले जाणार असल्याचे नगरसेवक बाबू वागसकर यांनी सांगितले.

  शीतपेयांच्या “कॅन’चे उदाहरण देत मुंडे म्हणाल्या, ‘आपल्याकडे नवनवीन साधनांचा वापर वाढला आहे. मात्र, त्यामुळे निर्माण होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट कशी लावावी, याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. वैयक्तिक स्वच्छतेबरोबरच सार्वजनिक स्वच्छता महत्त्वाची आहे. मुलांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी या विषयाचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करणे गरजेचे आहे.”

  आमदार बापट व मिसाळ यांनी या प्रकल्पाची गरज स्पष्ट केली. महिलांच्या आरोग्याशी निगडित हा विषय असल्यामुळे प्रत्येक प्रभागात असा प्रकल्प सुरू करावा, अशी अपेक्षा मिसाळ यांनी व्यक्त केली.

 • turning_news002

  गुणगौरव सोहळ्याला अभूतपूर्व प्रतिसाद

  भाजयुमोच्या प्रदेशाध्यक्ष आ.पंकजाताई पालवे यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या…

 • turning_news

  हमखास यशासाठी आत्मविश्वास बाळगा

  हमखास यशासाठी आत्मविश्वास बाळगा

Page 28 of 31« First...1020...2627282930...Last »