• 9bjp

  सत्तेसाठी मतभेद, मनभेद दूर सारा

  भारतीय जनता पक्षाला पुन्हा सत्तेत यायचे असेल , तर पक्षातील लोकांनी आपला अहंकार बाजूला ठेवायला हवा. बुरसटलेल्या मनाने काम करू नका , असे सांगत पक्षातील मतभेद आणि मनभेद बाजूला ठेवण्याचे आवाहन भाजप युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष आमदार पंकजा मुंडे-पालवे यांनी शुक्रवारी केले.

  भाजप युवा मोर्चातर्फे क्रांतिदिनी एल्गार मेळावा भरविण्यात आला. मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार अनुराग ठाकूर , प्रदेश सरचिटणीस सिद्धार्थ शिरोळे , पुणे शहराध्यक्ष गणेश घोष , आमदार भीमराव तापकीर , माधुरी मिसाळ , अनिल शिरोळे , नगरसेविका नीलिमा खाडे आदी या वेळी उपस्थित होते.

  ‘ जनता आम्हाला निवडून देते , हा आघाडी सरकारचा अहंकार युवा वर्गाने मोडून काढण्याची आवश्यकता आहे. राज्यात घोटाळे स्वस्त झाले असून , दोनवेळचे अन्न महाग झाले आहे. गुन्हेगारी आणि कर्जात सध्या महाराष्ट्र अग्रेसर आहे. घोटाळयाचे मूळ सिंचन घोटाळ्यात आहे ,’ अशी टिप्पणीही पंकजा मुंडे-पालवे यांनी केली. सत्तेत आल्याशिवाय विकास करता येणार नाही. आघाडी सरकारची सत्ता उलथवून टाकायची असेल , तर एल्गार यात्रेच्या माध्यमातून लाखो तरुण जोडले जावेत , अशी अपेक्षा ठाकूर यांनी व्यक्त केली.

 • BJP-Yuva-morcha_Lokmat_Pune_10-Aug_Pg-3

  संतापाचे रुपांतर मतदानात करून घ्या

  कॉंग्रेसने शहीद जवानांचा जो अपमान केला, तो हा देश विसरणार नाही. सामान्य जनतेच्या मनात सरकार बद्दल संताप आहे…

 • sangali

  सांगली : एल्गार-against-आघाडी-सरकार

  भ्रष्ट आणि घोटाळेबाज कॉंग्रेस आघाडी सरकारची सत्ता उलथवून टाकून केंद्रात आणि राज्यात सत्तापरिवर्तन व्हावे. युवकांमध्ये याबाबत जनजागृती व्हावी या उद्देशाने भाजपा युवा आघाडी मोर्चातर्फे एल्गार पुकारण्यात आला असल्याची माहिती भाजपा राज्य युवा मोर्चाच्या अध्यक्षा पंकजा मुंडे-पालवे यांनी आज सांगलीत पत्रकार परिषदेत दिली. कॉंग्रेस आघाडी सरकारचा भ्रष्ट कारभार, घोटाळे, वाढती महागाई, रुपयाचे अवमूल्यन यामुळे देशातील जनतेत सरकारविरोधात असंतोष पसरला आहे. आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्यात सत्ता परिवर्तन व्हावे याबाबत युवक आणि नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने राज्यभर भाजपा युवा आघाडी मोर्चातर्फे एल्गार मेळावे आयोजित करण्यात येत असून त्याची सुरवात ९ ऑगस्टपासून तूळजापूर येथून करण्यात आली आहे. तूळजापूरनंतर पुणे आणि त्यांनतर आज सांगलीत हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. युवकांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी या मेळाव्यामधून व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये १८ ते २५ वयोगटातील युवकांची भाजप पक्षाला पसंती मिळावी आणि भाजपची ताकद वाढावी, हा यामागील प्रमुख उद्देश आहे. उठ युवा जागा हो, सत्ता परिवर्तनाचा धागा हो, हे या एल्गार मेळाव्याचे ब्रीदवाक्य आहे. युवकांना रोजगार मिळावा, उद्योगनिर्मिती वाढावी, दुष्काळी भागातील विदयार्थ्यांचे परीक्षा आणि शिक्षण शुल्क माफ व्हावे हा या मेळाव्याचा मुख्य अजेंडा आहे. डॉ. नरेंद्र दाभोळकरांची हत्या ही पुरोगामी महाराष्ट्राला शरमेने मान खाली घालायला लावणारी आहे. जादूटोणा विरोधी विधेयकास आमचा पाठिंबा आहे. महाराष्ट्रात स्त्रियांवरील अत्याचार वाढत आहेत. कडक शिक्षेची गुन्हेगारांना भीती नसल्याने बलात्काराचे गुन्हे वाढत आहेत. कडक कायदे करण्याची सरकारची इच्छाशक्ती नाही, या प्रकरणांसाठी फास्ट ट्रॅक कोर्टांची संख्या वाढवण्याची आवश्यकता आहे असेही यावेळी मुंडे म्हणाल्या.

 • IMG-20130809-WA001

  खा. मुंडेंचा पराभव करणे शरद पवारांना जमले नाही तर त्यांच्या पुतण्याला काय जमणार?

  खा. मुंडेंचा पराभव करणे शरद पवारांना जमले नाही तर त्यांच्या पुतण्याला काय जमणार?

 • daunapurphoto

  वैद्यनाथ पॅटर्नच्या बंधाऱ्यामुळे शेतकऱ्यांची पाण्याची समस्या सुटली -आ. पंकजाताई पालवे

  वैद्यनाथ पॅटर्नच्या बंधाऱ्यामुळे शेतकऱ्यांची पाण्याची समस्या सुटली -आ. पंकजाताई पालवे

 • tuljapur

  तुळजापूर : एल्गार-against-आघाडी-सरकार

  दि. ७-०८-२०१३ रोजी भाजयुमोच्या प्रदेशाध्यक्ष पंकजा मुंडे-पालवे यांनी तुळजापूरच्या भवानी मातेचे दर्शन घेऊन ” एल्गार against आघाडी सरकार ” च्या आंदोलनासाठी सर्व महाराष्ट्रातील जनतेतर्फे आशीर्वाद घेतले. सर्वप्रथम काल हुतात्मे झालेल्या वीर भारतीय जवानांसाठी व त्यांच्या कुटुंबियांसाठी भवानी मातेकडे प्रार्थना केली . केंद्रातील यूपीए सरकारच्या विरोधात भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने ‘ एल्गार ‘ पुकारण्यात आला आहे. प्रदेश भाजयुमोच्या वतीने आयोजित या राज्यव्यापी कार्यक्रमास येत्या शुक्रवारी (ता.९) पुण्यातून सुरुवात होणार आहे. भाजयुमोच्या प्रदेशाध्यक्ष पंकजा मुंडे-पालवे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. दोन दशकांपूर्वी भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी राज्यात संघर्ष यात्रा काढली होती. त्या धर्तीवर यंदाही महाराष्ट्र ढवळून काढण्यात येणार आहे. ‘ विविध लोकसभा मतदारसंघांमध्ये मेळावे घेण्यात येणार असून राज्यातील जनतेच्या असंतोषाला व्यासपीठ देण्यात येईल ,’ असे पंकजा मुंडे यांनी सांगितले. क्रांतिदिनाच्या दिवशी सकाळी अकरा वाजता बालगंधर्व रंगमंदिरामध्ये संघटनेचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांच्या हस्ते याचा प्रारंभ होणार आहे. ‘ प्रामुख्याने युवकांच्या प्रश्नांवर यामध्ये भर देण्यात येणार आहे. त्यामध्ये शिष्यवृत्ती , बेरोजगारी , युवा धोरण आणि युवकांसमोरील आव्हानांची चर्चा करण्यात येईल ,’ असे त्या म्हणाल्या. महाविद्यालयांमधील निवडणुका पुन्हा सुरू करण्याचे सूतोवाच सरकारने केले आहे , त्याचे मुंडे यांनी स्वागत केले. महागाईने ग्रासलेल्या जनतेची सरकार चेष्टा करत असल्याचा आरोप, मुंडे यांनी यावेळी केला.

 • Pankaja-Mundhe-News_Maharashtra-Times_Pune_5-Aug_Pg-5

  ‘युपीए’ सरकारविरोधात ‘भाजयुमो’चा एल्गार

  केंद्रातील युपीए सरकारच्या विरोधात भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आयोजित या राज्यव्यापी कार्यक्रमास…

 • 1073

  मराठवाड्याला हक्काचे पाणी मिळण्यास जलसंपत्ती प्राधिकरणाची आडकाठी

  जायकवाडी प्रकल्पाला नदीखोर्‍यातील पाण्याचा समन्यायी वाट मिळण्याबाबत राज्य सरकारच्या…

 • वैद्यनाथ महिला बचतगट महासंघ महिला सक्षमीकरणासाठी एक पाऊल पुढे…

 • सत्ता परिवर्तनात युवा मोर्चाची भूमिका महत्वाची -खा. मुंडे

  आ. पंकाजाताई मुंडे-पालवे यांच्या वेबसाईटचे देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे यांच्या हस्ते थाटात उद्‍घाटन…

Page 29 of 31« First...1020...2728293031