अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सवानिमित्त चौंडी येथे कार्यक्रम
अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सवानिमित्त चौंडी येथे कार्यक्रम

आ. पंकजाताईंच्या प्रश्नामुळे सात हजार अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीतील त्रुटी दूर करण्याचे निर्देश
बीड जिल्ह्यातील सात हजारांपेक्षा अधिक अल्पसंख्यांक…
औरंगाबादमध्ये भाजपाचा एल्गार
आघाडी सरकारने या देशामधल्या गोरगरीब, श्रमकरी, कष्टकरी व सामान्य जनतेची पिळवणूक केली आहे. एवढेच नाही तर गेल्या चार वर्षापासून महागाईचे सत्र सुरूच ठेवत…

भाजप युवा मोर्चाची मदार प्रथमच महिलेकडे
‘ताई’ नेतृत्व ‘लय भारी’ असल्याचे सांगत युवती संघटन राजकीय व्यवस्थेचा मुख्य भाग बनेल, अशी मांडणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून केली जाते. मराठवाडय़ात पाळेमुळे रुजविण्यासाठी राष्ट्रवादीने बरेच प्रयत्न केले. तुलनेने काँग्रेसचे संघटन कुपोषित असल्यासारखे वातावरण आहे. या पाश्र्वभूमीवर भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी आमदार पंकजा पालवे यांची नेमणूक करण्यात आली. त्यामुळेच मराठवाडय़ात युवकांचे संघटन उभे करणे त्यांच्यासाठी आव्हान असणार आहे.
मराठवाडय़ात एकीकडे विविध जाती-संघटनांनी डोके वर काढले. त्याला राजकीय पाठबळही दिले जाते आहे. अशा वातावरणात प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आव्हान असल्याचे आमदार पंकजा पालवेही मान्य करतात. भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन व खासदार गोपीनाथ मुंडे यांनीही हे पद पूर्वी भूषविले. त्यामुळे या पदाची जबाबदारी अधिक आहे. कोणाच्या पावलावर पाऊल ठेवून काम करणार नाही, तर युवकांचे संघटन व त्यांना लोकसभेच्या निवडणुकीसाठी ‘रिचार्ज’ करणे हे उद्दिष्ट असल्याचे आमदार पालवे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. राज्याच्या राजकारणात ‘लोकनेता’ म्हणून राष्ट्रवादीचे नेते शरद पवार व भाजपचे गोपीनाथ मुंडे यांच्या नावाची नेहमीच चर्चा असते. पवारांनी त्यांची कन्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासाठी युवती राष्ट्रवादीचे व्यासपीठ उभे करून दिले. सामाजिक, आर्थिक तसेच कला क्षेत्रातील विविध मान्यवरांच्या भेटी घेत युवतींच्या माध्यमातून त्यांनी संघटन उभारणीसाठी कार्यक्रम घेतले. राजकीय क्षेत्रात महिला नेतृत्वाची पोकळी त्या भरून काढतील, असे राष्ट्रवादीतील कार्यकर्ते आवर्जून सांगत. या पाश्र्वभूमीवर अन्य पक्षात मात्र महत्त्वाच्या पदांची जबाबदारी महिलांकडे आवर्जून दिली जात नसल्याचे चित्र आहे. विशेषत: मराठवाडय़ात तर त्याची वानवाच म्हणावी, असे वातावरण आहे.
काँग्रेसमध्ये रजनीताई पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसच्या फौजिया खान, सूर्यकांता पाटील, उषाताई दराडे, सुशीला मोराळे, शिवसेनेच्या आमदार मीरा रेंगे ही नावे वगळली, तर उस्मानाबाद, हिंगोली, नांदेड, लातूर, औरंगाबाद जिल्ह्य़ांमध्ये तसे नेतृत्व उभे राहिले नाही. महिलांनी महिलांच्या क्षेत्रात नेतृत्व करावे, असा जणू संदेशच आतापर्यंत दिला जात असे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या कार्यपद्धतीमुळे तो अधोरेखित झाला. त्यामुळे पुरुष व महिला यांचे नेतृत्व महिलेकडे असावे, अशी बांधणी पक्षीय पातळीवर फारशी झाली नाही.
भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी पंकजा पालवे यांची नेमणूक त्या अर्थाने वेगळी असल्याचे सांगितले जाते. केवळ युवतींसाठी काम नाही तर युवा वर्गासाठी काम करू. भाजपमधील महिला संघटन अनेक वर्षांपासून मजबूत आहे. राष्ट्रीय स्तरावरही महिलांनी नेतृत्व केले आहे. त्यामुळे युवकांचे संघटन उभे करण्यास कोठेही मागे पडणार नाही, असे आमदार पालवे सांगतात.
आमदार पालवे यांच्या नियुक्तीनंतर भाजयुमोचे माजी प्रदेशाध्यक्ष संभाजी पाटील निलंगेकर यांच्याविषयी मात्र उलटसुलट चर्चाना सुरुवात झाली आहकाही दिवसांपासून ते नाराज होते. वेगवेगळ्या कार्यक्रमात खासदार मुंडे यांच्या नेतृत्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण करण्याच्या त्यांच्या वागणुकीवरून कुजबूज सुरू होती. काही दिवसांपूर्वीच त्यांनी बारामतीत राष्ट्रवादीच्या नेत्यांची भेट घेतल्याची चर्चा आहे. या अनुषंगाने त्यांना थेट विचारले असता, पक्ष बदलण्याचा विचार नसल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. पक्ष पातळीवर सुरू असणारी सुंदोपसुंदी व संघटन बांधणीत राष्ट्रवादीसह इतर पक्षांचे उपक्रम याला पंकजा पालवे कसे सामोरे जातात, यावर बरेच अवलंबून असेल. मात्र, या निमित्ताने दोन मोठय़ा नेत्यांच्या लेकींच्या नेतृत्वाची तुलना मात्र केली जाईल, असे राजकीय विश्लेषक सांगतात.
रामराज्य आणण्यासाठी शिरपूरच्या धर्तीवर वैद्यनाथ पॅटर्न निर्माण करू : आ.पंकजा पालवे
परळी (parali) – दुष्काळी परिस्थितीत उद्भवणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शिरपूर पॅटर्नच्या धर्तीवर पाणी साठवण बंधाऱ्याची कामे आदर्श पध्दतीने करून तालुक्यात जलसंधारणाच्या कायाचा वैद्यनाथ पॅटर्न निर्माण करून अशी ग्वाही आ.पंकजाताई मुंडे-पालवे यांनी आज बोलताना दिली.
वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना व वैद्यनाथ सर्वांगिण विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शिरपूर पॅटर्नच्या धर्तीवर जलसंधारणाच्या कामाचा शुभारंभ आ.पालवे यांच्या हस्ते आज वैद्यनाथ कारखान्याजवळ कौठळी शिवारात श्रीफळ फोडून व मशिनरीची पूजा करून करण्यात आला, त्यावेळी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजप नेते आर.टी.देशमुख तर प्रमुख पाहुणे म्हणून परळी पं.स.सभापती लक्ष्मीबाई फड, वैद्यनाथ कारखान्याचे उपाध्यक्ष नामदेवराव आघाव, जि.प.सदस्य वृक्षराज निर्मळ, आशाताई किरवले, पं.स.सदस्य सतीश मुंडे, प्रा.बिभीषण फड, भास्कर रोडे, सुग्रीव मुंडे, वैद्यनाथ कारखान्याचे संचालक माधवराव मुंडे, वैद्यनाथ बॅंकेचे संचालक रमेश कराड, डॉ.शालिनी कराड, भाजयुमोचे तालुकाध्यक्ष सुरेश माने, भाजपचे सरचिटणीस सुधाकर पौळ, युवा मोर्चाचे सरचिटणीस मुन्ना काळे, वैद्यनाथचे कार्यकारी संचालक अशोक पालवे उपस्थित होते.
दुष्काळी परिस्थितीमुळे जिल्ह्यात सध्या पाण्याची फार मोठी समस्या निर्माण झाली आहे. भाजपा नेते खा.गोपीनाथराव मुंडे यांच्या संकल्पानुसार जिल्ह्यात सर्वत्रे शिरपूर पॅटर्नच्या धर्तीवर बंधारे बांधण्यात येणार आहेत. या बंधाऱ्यामुळे पाण्याची साठवण क्षमता वाढणार असून भविष्यात पाणीटंचाई निर्माण होणार नाही, अशा पध्दतीने ही कामे हाती घेण्यात आली आहेत. कौठळी शिवारात एक किमी लांबीचा नाला 50 फूट रुंद व 25 फूट खोल करण्यात येणार असून त्यावर सुमारे 25 लाख रुपये खर्च करून तीन बंधारे बांधण्यात येणार असल्याचे आ.पालवे म्हणाल्या. या बंधाऱ्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरणार असून परिसरातील विहीरीला व बोअरला चांगले पाणी लागेल. पाण्याची नैसर्गिक पातळी तर वाढेलच त्याचबरोबरच गाळ ट ाकल्यामुळे जमिनीचा कसही सुधारेल असेही त्यांनी सांगितले. खा. मुंडे यांनी उपमुख्यमंत्री असताना जिल्ह्यात कोट्यवधी रुपये खर्च करून सिंचन क्षमता वाढवल्यामुळे शेतकरी आज सुखात आहे. जेथे ओटी भरायलाही ऊस नव्हता त्या ठिकाणी आज शेतकऱ्यांनी ऊसाचे उत्पादन करून आपले जीवनमान उंचावले असल्याचे त्या म्हणाल्या. वैद्यनाथ कारखान्यात खा.मुंडे यांनी ऊसाचे अथवा पाण्याचे कधीही राजकारण केले नाही. प्रत्येक कामात राजकारण आणण्याचा उद्योग सध्या सुरू असून जनताच याला कंटाळली आहे. जलसंधारणाच्या कामाचा रामनवमीच्या दिवशी शुभारंभ करण्याचा हाच हेतू होता की, प्रभू रामचंद्रांनी एक वचनी राहून जसे राज्य केले त्याप्रमाणे जनतेला दिलेले वचन पुर्ण करण्याचा आम्ही निर्धार केला आहे. परळीत रामराज्य आणण्याचा आपला संकल्प असल्याचे आ.पालवे म्हणाल्या. यावेळी माजी जिल्हाध्यक्ष आर.टी.देशमुख यांनी आपल्या भाषणात शिरपूर पॅटर्न राबवून खा.मुंडे, आ.पंकजाताई यांनी या परिसरात दुसरी क्रांती केल्याचे सांगितले. जनतेच्या कामासाठी आ.पंकजाताई करीत असलेल्या कष्टाचे त्यांनी तोंडभरून कौतुक केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैद्यनाथ कारखान्याचे व्हाईस चेअरमन नामदेवराव आघाव यांनी तर संचलन व आभार ज्ञानोबा सुरवसे यांनी मानले. कार्यक्रमास पंचक्रोशीतील ग्रामस्थ, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बचतगटाची चळवळ प्रभावीपणे राबविणाऱ्या नेत्या
महिला बचतगटाच्या माध्यमातून मतदार संघात स्रियांचे सबलीकरण करण्यासाठी आमदार पालवे यांनी…

आ.पंकजा मुंडे-पालवे यांना उत्कृष्ट वक्ता पुरस्कार
विविध प्रश्नांवर विधानसभेमध्ये आणि सभागृहाबाहेर प्रभावी काम केल्याबद्दल मुंबईच्या ‘न्यूजमेकर्स ब्रॉडकॉस्टिंग अँड कम्युनिकेशन’ने (एनबीसी) आमदार पंकजा मुंडे – पालवे यांना राजकारणातील ‘उत्कृष्ट वक्ता’ पुरस्कार देण्यात आला. या पुरस्काराचे नुकतेच वितरण करण्यात आले. आमदार मुंडे यांनाज्येष्ठ पत्रकार पुण्यप्रसुन वाजपेयी यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. या वेळी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, भारतीय जनता पक्षाचे नेते प्रकाश जावडेकर, तब्बसूम, स्मिता ठाकरे आदी उपस्थित होते.
स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी शपथ
लोकनेता :पंकजा मुंडे-पालवे ह्यांचे मनोगत
लोकनेता..गोपीनाथ मुंडे..गोपीनाथ मुंडे म्हणजे एक वादळ..अनेकांना कवेत घेणारं..परळीजवळच्या एका खेड्यात जन्मलेल्या गोपीनाथ मुंडेनीं अनेक अडथळे आणि सीमा ओलांडत एक देशव्यापी नेतृत्व उभं केलं..सत्तेच्या बुलंद बुरुजांना धडका देताना मुंडेनी स्वतःची कधी चिंता केली नाही..सारा महाराष्ट्र ढवळून काढण्याचं एक अफाट सामर्थ्य गोपीनाथरावांमध्ये होत..परिवर्तनाची आस बाळगणाऱ्या या झंझावाताच्या वादळी प्रवासाचा एक चित्रमय आलेख..