• Unforgettable Year 2014…

  Speech in “Mahayuticha MahaYelgaar” in Beed

  This was the 1st meeting of Mahayuti in Maharashtra before Loksabha elections and it was attended by all senior Mahayuti leaders. It was a massive meeting so was bit nervous initially as I was speaking for the first time with so many senior leaders on dais including my father. This meeting created good platform for my whirlwind Loksabha election campaign across Maharashtra.

  http://youtu.be/JlQn-Km0ba4

  “Bhagwan Gadh” speech in Ahmednagar

  Even today I don’t know how I mustered energy to speak at this meeting. It was my first public meeting after Baba’s sudden demise. Every inch of Bhagwan Gadh was occupied by people who were eager to listen to me, what I am going to speak. The whole atmosphere was full of emotions and when I was speaking there was eerie silence among lacs of supporters. That unconditional support from millions gave me real strength to carry on Baba’s legacy and his work.

  http://youtu.be/gu8uuV4X6Co

  Speech in “Sangharsh Yatra : Day 1”

  I wanted to thank everyone for their support and gratitude during the most difficult time we would have ever imagined post Baba’s sudden demise so with blessings from all, I took out “Sangharsh Yatra” from Sindkhed Raja – birthplace of Rajmata Jijabai. Sangharsh yatra rejuvenated every one and was instrumental in reaching out to millions across several districts of Maharashtra.

  http://youtu.be/ZteHp8t3Bmc

  Speech in “Sangharsh Yatra concluded” in Chaundi

  Sangharsh Yatra concluded in Chaundi in Ahmednagar – birthplace of Ahilyadevi Holkar. Meeting was attended by Hon. BJP President Amitji Shah and all senior leaders. Massive support for Sangharsh yatra was instrumental in assuring millions of Baba’s supporters that his social work will continue unabated forever…

  http://youtu.be/5vkxhoy9T5M

  Mumbai Sabha (Murbaad, Ulhasnagar & Ghatkopar)

  During Maharashtra Assembly elections campaign, travelled across length and breadth of Maharashtra by every possible means of travel. Right from helicopter, aircraft to Mumbai’s local train..faced every possible weather conditions..at one place it was thundering rains and at next meet meeting place it was scorching heat.. Affection, love and support helped me survive all this !!

  http://youtu.be/Mt6fEd-KeYI

  Majha Maharashtra Majha Vision

  Huge responsibility of 4 major government departments, guardianship of Beed and Latur .. Devoting every minute to push things in every possible manner then be it women security, child malnutrition or water scarcity across hundreds of villages. Trying to put a self sustaining long term plan for such issues..This speech is My Vision for My Maharashtra.. for every women, farmer and every child.. As Hon. PM Shri Modi ji mentioned, we have to move away from ABCD (Avoid Bypass Confuse Delay) to ROAD (Responsibility Ownership Accountability Discipline).. Let me assure once again –
  “उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही!”

  http://youtu.be/FQDeS-sESYI

  2015 isn’t about the End. It is for New Beginnings, Peace and Hope. Hope for a Better Future and a Brighter Maharashtra. Here we come 2015!!!!

 • 10229

  एक अश्रू आनंदाचा… जनतेच्या आभाराचा

  एक अश्रू आनंदाचा… जनतेच्या आभाराचा

 • वैद्यनाथ पॅटर्न’ने केली 10 गावे जलस्वयंपूर्ण

  – आमदार पंकजा मुंडे- पालवे यांचा पुढाकार
  – 3300 कोटी लिटर पाण्याची साठवण
  – सव्वा कोटी रुपयांचा खर्च
  – वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याने दिला निधी


  बीड जिल्ह्यातील परळी व अंबाजोगाई तालुक्‍यांत जलसंवर्धनाचा पथदर्शी वैद्यनाथ पॅटर्न राबविण्यासाठी आमदार पंकजा मुंडे- पालवे यांनी पुढाकार घेतला. वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना, वैद्यनाथ सर्वांगीण विकास संस्था यांतून निधी उभा करत भर दुष्काळात केलेल्या पहिल्याच प्रयत्नात तब्बल दहा गावे जलसाक्षर झाली. “शिरपूर पॅटर्न’च्या धर्तीवर गावांची गरज व भौगोलिक परिस्थितीनुसार राबविलेल्या या पॅटर्नमुळे गावशिवारातील विहिरींची पाणीपातळी वाढली. प्रकल्पामुळे संपूर्ण गावे बदलली असा दावा नसला तरी पीकपद्धती बदलून अर्थकारणाला गती आणि गावे जलस्वयंपूर्ण झाली, हेच या पॅटर्नचे ठळक यश पुढे आले आहे.


  आमदार पंकजा मुंडे- पालवे यांच्या पुढाकारातून बीड जिल्ह्यात परळी व अंबाजोगाई तालुक्‍यांतील 10 गावे पथदर्शी वैद्यनाथ पॅटर्न प्रकल्प राबविण्यासाठी निवडण्यात आली. संपूर्ण मराठवाड्यात दुष्काळी झळा तीव्र होत असतानाच खासदार गोपीनाथ मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली कामाला सुरवात झाली.

  कामाची सुरवात
  प्रथम दोन्ही तालुक्‍यांचा भौगोलिक अभ्यास झाला. माजी आमदार पाशा पटेल यांच्या नेतृत्वाखाली पथक नेमण्यात आले. धुळे जिल्ह्यात जलसंवर्धनात देशभर नावारूपाला आलेल्या शिरपूर येथे (शिरपूर पॅटर्न) पथकाने भेटही दिली. लोकसहभाग वाढावा यासाठी सरपंच, उपसरपंच, सेवा सोसायटीचे चेअरमन, तंटामुक्‍त समितीचे अध्यक्ष आणि लोकप्रतिनिधी यांचा सहभाग घेत जिल्हापातळीवर जलसंकल्प परिषदेच्या रूपाने कार्यशाळा घेण्यात आली. ज्येष्ठ भूजलतज्ज्ञ सुरेश खानापूरकर यांच्यासह अन्य तज्ज्ञांनी जलसाक्षरतेचे धडे दिले. लोकसहभाग वाढू लागला. गावात जुन्या बंधाऱ्यांच्या दुरुस्तीपासून थेट नव्याने नाला खोलीकरणाची कामे सुरू झाली. नवा वैद्यनाथ पॅटर्न त्यातून जन्माला आला, त्यातून पहिल्याच टप्प्यात तब्बल दहा गावे जलसंपन्न झाली.

  अशी झाली कामे
  परळी व अंबाजोगाई तालुक्‍यांतील गावांमध्ये नाल्यांचे रुंदीकरण, खोलीकरण व गरज असलेल्या गावात नव्याने बंधारा बांधण्याचे काम हाती घेतले. कौठळी, दौनापूर, धर्मापुरी, पट्टीवडगाव, घाटनांदूर, रेवली, सिरसाळा, वाका, नाथ्रा, उजनी या गावांत एका पाठोपाठ कामे पूर्ण केली. या गावांमधील नाल्यांत गाळ साचला होता. झाडाझुडपांनी नाल्याला वेढले होते. त्याची साफसफाई करून खोलीकरण करण्यात आले. उत्तम साइड असलेल्या गावात नव्याने प्रकल्प पूर्ण करण्यात आला. पावसाचे तीन महिने उलटले तरी त्याची समाधानकारक नोंद नसलेल्या बहुतांश गावांमधील प्रकल्प पाण्याने तुडुंब भरले आहेत. सुमारे दहा गावांत नदी- नाल्यांवर 22 बंधारे साकारले. निवृत्त शाखा अभियंता मारोतीराव वनवे, निवृत्त अभियंता श्री. मिसाळ यांनी तांत्रिकदृष्ट्या काम पूर्ण होण्याकडे लक्ष घातले. आधुनिक यंत्रांच्या साह्याने पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण व्हावीत असे नियोजन होते. यासंदर्भात समन्वयाची जबाबदारी पाहणारे लक्ष्मीकांत कराड यांनी कामे वेळेत व दीर्घकालीन व्हावीत यावर भर दिला.

  पीकपद्धती बदलली
  “वैद्यनाथ पॅटर्न’च्या यशस्वी कामांमुळे बहुतांश गावांमध्ये पीकपद्धतीत आमूलाग्र बदल घडला आहे. खरिपात सोयाबीन आणि कपाशी एवढीच पिके घेणारी गावे भाजीपाला पिकाकडे वळली आहेत. परळी व अंबाजोगाई बाजारपेठ जवळच असल्याने बाजारपेठेचीही अडचण दूर झाल्याचे शेतकरी सांगतात.

  * हजार एकर क्षेत्राला सिंचनाचा लाभ
  दहा गावांत साकारलेल्या वैद्यनाथ प्रकल्पामुळे सुमारे एक हजार एकर शेती सिंचनाखाली येईल असा अंदाजही पहिल्या टप्प्यात बांधण्यात आला आहे. ऊसक्षेत्रही 300 एकरांपर्यंत वाढण्याचा अंदाज जाणकारांकडून व्यक्त केला जात आहे.

  वैद्यनाथ प्रकल्पाचे असे झाले फायदे –
  1. गावातच पाण्याची बॅंक निर्माण झाल्याने गावे जलस्वयंपूर्ण होण्यास मदत झाली.
  2. जुन्या तलावांचे खोलीकरण व रुंदीकरण केल्यामुळे पाझर क्षमता वाढली, त्यामुळे भूजलपातळी उंचावण्यास मदत झाली.
  3. शेतकरी नगदी पिकांकडे वळू लागले. खरिपासोबतच रब्बी पिकांचे यशस्वी उत्पादन घेणे शक्‍य होणार असून, उन्हाळ्यातील पाणीटंचाई दूर होणार आहे.
  4. जलसंधारण कामांमुळे पहिल्याच पावसात बंधारे तुडुंब भरले. गावातील पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी भरल्या व योजना ——– सुरू होण्यास मदत झाली.
  5. प्रकल्पाकडे सुरवातीला दुर्लक्ष करणारा शेतकरी आता स्वतःहून पुढाकार घेऊ लागला आहे.
  6. गावशिवारातील पाणी पातळी वाढल्यामुळे शेतकऱ्यांत उत्साह वाढला.
  7. उसाचे क्षेत्र वाढून 300 एकरांपर्यंत येण्याचा अंदाज
  8. हजार एकरांच्या जवळपास दुबार पिकांसाठी लाभ
  9. दहा गावांतील पाणीटंचाई दूर झाली.
  10. बंधाऱ्यात मत्स्यबीज सोडून शेतकरी मत्स्यपालनही करू लागले.

  “”वैद्यनाथ पॅटर्न राबविलेल्या गावांमध्ये सकारात्मक परिणाम समोर येऊ लागले आहेत. दुष्काळमुक्‍त गावे निर्माण करण्यासाठी केलेला पहिला प्रयत्न यशस्वी होत असल्याचा आनंद मोठा आहे. यापुढेही गावागावांत याच पद्धतीने प्रकल्प राबविण्याचा मानस आहे.”
  – पंकजा मुंडे- पालवे, आमदार, परळी, जि. बीड

  “”परळी व अंबाजोगाई तालुक्‍यांतील दहा गावांत “वैद्यनाथ पॅटर्न’चे काम पूर्ण झाले आहे. दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या या गावांत पहिल्याच पावसात बंधारे पाण्याने भरले. तज्ज्ञांच्या मते सुमारे 3300 कोटी लिटर पाणी या माध्यमातून साठविले व जिरवले जाणार आहे. गावातील विहिरींना मुबलक पाणी आले आहे. शेतकरी नव्या पिकांच्या शोधात आहेत.”
  – लक्ष्मीकांत कराड, समन्वयक, वैद्यनाथ पॅटर्न, परळी, जि. बीड

  अशी आहेत जलस्वयंपूर्ण गावे
  पट्टीवडगाव पूर्वी गावातील विहिरींना अत्यंत कमी पाणी होते. वैद्यनाथ पॅटर्नचे काम पूर्ण झाले अन्‌ पहिल्याच पावसात विहिरींना पाणी वाढले. याच पाण्याच्या भरवशावर ऊस लागवड झाली आहे. खरिपात सोयाबीन व रब्बीत गहू घेणे शक्‍य होणार आहे.
  – हरिश्‍चंद्र वाकडे- 9422079526
  पट्टीवडगाव, ता. अंबाजोगाई, जि. बीड

  * उजनी
  प्रकल्पापूर्वी गावातील विहिरींना दहा फूटही पाणी येत नव्हते. बहुतांश बोअरवेल बंद पडले होते. दोन बंधाऱ्यांच्या प्रस्तावित बाजू सोडून अर्धा किलोमीटर अंतरापर्यंत खोलीकरण व रुंदीकरण करण्यात आले. प्रकल्पानंतर गावशिवारातील विहिरी तुडुंब भरून वाहू लागल्या आहेत. बंद पडलेले बोअरवेलही सुरू झाले आहेत. गावच्या पाणीपुरवठा योजनेला 95 टक्‍के फायदा झाला आहे. खरीप व रब्बी दोन्ही पिके घेता येणे शक्‍य आहे. उन्हाळ्यातही पाणीटंचाई भासणार नाही.
  – साहेबराव माने- 9767991489
  उजनी, ता. अंबाजोगाई, जि. बीड

  * वाका
  वाका गावात जुन्या नाल्याचे खोलीकरण केल्यामुळे पाणीसाठवण क्षमता वाढली. गावातील विहिरींनाही पाणी वाढले आहे. सद्यःस्थितीत पाऊस नसल्याने कपाशीला याच प्रकल्पातून पाणी देण्यात येत आहे. दुष्काळी स्थितीत गाव पाण्याबाबतीत स्वयंपूर्ण झाले आहे. विहिरीवरून पाणी वाहू लागले आहे. बंधारेही पूर्णपणे भरले आहेत. वर्षभर भाजीपाला पिके घेणे शक्‍य होणार आहे.
  – विजय कराड- 9422243765
  – मुकिंदा भास्कर- 9637179400
  वाका, ता. परळी, जि. बीड

  धर्मापुरी
  गावात नदीवरील सिमेंट बंधाऱ्यांचे रुंदीकरण व खोलीकरण केले. पूर्वी बंधारे गाळामुळे भरले होते, त्यामुळे साहजिकच पाणी टिकत नव्हते. गावातील याच बंधाऱ्यांना नव्याने आकार देण्यात आला, त्यामुळे आजघडीला दीड किलोमीटर अंतरापर्यंत खोलीकरण व रुंदीकरण केलेले बंधारे तुडुंब भरले आहेत. तीस फूट विहिरीही पाण्याने भरल्या आहेत. खरीप, रब्बीसह भाजीपाला शेतीसाठी फायदा होणार आहे.
  निळकंठ खुशालराव फड- 9423774716
  धर्मापुरी, ता. परळी, जि. बीड

  * दौनापूर
  गावालगत असलेल्या बंधाऱ्यात पूर्वी अवघे दीड फूट पाणी राहात होते. वैद्यनाथ प्रकल्पात गावाचा समावेश झाला अन्‌ बंधाऱ्यातला गाळ उपसला. बंधाऱ्याचे रुंदीकरण- खोलीकरण झाले. 180 मीटर लांब व एक ते दीड फूट खोलीत वाढ केल्याने पाणीसाठवण व झिरपण क्षमतेत वाढ झाली. दुष्काळमुक्‍त गावाकडे व प्रगतिशील शेतीकडे वाटचाल सुरू झाली आहे.
  – प्रकाश प्रल्हाद मिटकरी- 9765144891
  दौनापूर, ता. परळी, जि. बीड

  नाथ्रा
  गावात तीन ठिकाणी नाला खोलीकरण व रुंदीकरण करण्यात आले. 28 फूट खोल व 27 फूट रुंदीच्या या कामांमुळे गावालगतच्या विहिरींच्या पाणीपातळीत सुमारे 70 टक्‍के वाढ झाली. शेतीसाठी पाण्याचा लाभ झालाच, शिवाय गाव पाण्याच्या बाबतीत नक्‍कीच स्वयंपूर्ण झाले याचा आनंद वाटतो. ऊस लागवड वाढणार असून, शेतीच्या उत्पादनातही निश्‍चितपणे वाढ होईल.
  – फुलचंद मुंडे- 9421346352
  नाथ्रा, ता. परळी, जि. बीड

  घाटनांदूर
  गावात दोन सिमेंट बंधाऱ्यांत जलसंवर्धनाचा प्रयोग करण्यात आला. कठीण खडक फोडून काम पूर्ण करण्यात आले. त्यामुळे विहिरींच्या पाणीपातळीत वाढ झाली. पावसाने दडी मारली तरी पहिल्या पावसाचे प्रकल्पात साठलेले पाणी फळशेतीसह सोयाबीन व अन्य पिकांना देता आले. पाऊस नसल्याचा दरवर्षी पिकांवर होणारा परिणाम यंदा होणार नाही. बंधाऱ्यात मत्स्यबीजही सोडण्यात आले आहे. याचा दुहेरी लाभ मिळणार आहे.
  – धनंजय जाधव- 9421342242
  घाटनांदूर, ता. अंबाजोगाई, जि. बीड

  रेवली
  गावातील सिमेंट बंधाऱ्याला गळती होती. बंधाऱ्यात पाणी साठविले जात नव्हते. सिमेंट बंधाऱ्याच्या वरील भागात खोलीकरण व रुंदीकरण करण्यात आले. गावातील शेती शिवाराला चांगलाच फायदा मिळाला आहे.
  – सुरेश बाबूराव बनसोडे
  रेवली, ता. परळी, जि. बीड

  सिरसाळा
  गावात प्रकल्पापूर्वी पाण्याची समस्या होती. एका बंधाऱ्याचे खोलीकरण, रुंदीकरण झाले. गावात ऊस, सोयाबीन व कापूस या पिकांना तुटीच्या काळात पाणी देण्यासाठी आधार झाला. एका कामानंतर एवढा बदल, तर कामांची संख्या वाढवली तर गावाचे संपूर्ण चित्र बदलायला वेळ लागणार नाही. प्रकल्पांतर्गत असलेल्या विहिरीला अवर्षणस्थितीतही काठोकाठ पाणी आहे. विहिरींच्या याच पाण्यावर सद्यःस्थितीतही कपाशी व ऊस तरला आहे.
  तारकमल शिवलाल ललवाणी- 9421350794
  सिरसाळा, ता. परळी, जि. बीड

  संपर्क : लक्ष्मीकांत कराड- 9422328429
  समन्वयक, वैद्यनाथ पॅटर्न, परळी, जि. बीड

  वैद्यनाथ पॅटर्न कामाचा सविस्तर तपशील
  गावाचे नाव एकूण कामे एकूण लांबी (मीटरमध्ये)
  कौठळी 03 1100
  दौनापूर 01 180
  धर्मापुरी 02 400
  पट्टीवडगाव 02 375
  घाटनांदूर 02 400
  रेवली 03 200
  सिरसाळा 01 400
  वाका 03 600
  नाथ्रा 02 300
  उजनी 02 400

  गावालगत साकारलेल्या प्रकल्पात सव्वा किलोमीटर लांब, 50 ते 60 फूट रुंद, तर तब्बल 40 फुटांपर्यंत खोलीचे काम करण्यात आले. आता पाणी साठवणक्षमतेत वाढ झाली आहे. प्रकल्पाच्या अवतीभवती असलेल्या विहिरी पूर्ण भरल्या आहेत. पावसाच्या खंडाच्या काळात पिकांना पाणी देणे शक्‍य झाले. पीक उत्पादकता वाढवणे शक्‍य होणार आहे. प्रकल्पापूर्वी तासभर चालणारा मोटरपंप आता दिवसभर चालविणे शक्‍य झाले आहे.
  नामदेवराव आघाव, 9623443702
  कोठळी, ता. परळी, जि. बीड

 • वैद्यनाथ महिला बचतगट महासंघ महिला सक्षमीकरणासाठी एक पाऊल पुढे…

 • लोकनेता :पंकजा मुंडे-पालवे ह्यांचे मनोगत

  लोकनेता..गोपीनाथ मुंडे..गोपीनाथ मुंडे म्हणजे एक वादळ..अनेकांना कवेत घेणारं..परळीजवळच्या एका खेड्यात जन्मलेल्या गोपीनाथ मुंडेनीं अनेक अडथळे आणि सीमा ओलांडत एक देशव्यापी नेतृत्व उभं केलं..सत्तेच्या बुलंद बुरुजांना धडका देताना मुंडेनी स्वतःची कधी चिंता केली नाही..सारा महाराष्ट्र ढवळून काढण्याचं एक अफाट सामर्थ्य गोपीनाथरावांमध्ये होत..परिवर्तनाची आस बाळगणाऱ्या या झंझावाताच्या वादळी प्रवासाचा एक चित्रमय आलेख..

 • post-image002

  “आई आहेस तर… आईत्व जप सखी…!” – आ.पंकजा मुंडे – पालवे

  लेक वाचवा – राष्ट्र वाचवा हे बिद्र वाक्य घेवून आ. पंकजा मुंडे – पालवे यांनी परळीमध्ये मोठे जनजागृती अभियान राबविले. औरंगाबादला त्यांनी 4 ऑक्टोबर रोजी जनजागृती अभियानाची रॅली काढण्याचा निर्धार केला आहे. त्यासाठी त्यांनी दोन दिवस औरंगाबादमधील अनेक संस्थांना भेटी देवून या अभियानांत सहभागी होण्याचे आवाहन केले.या अभियानाच्या निमित्ताने त्यांच्याशी केलेली बातचीत…

  लेक वाचवा अभियानाची आवश्यकता का भासली?
  गेल्या काही  वर्षापासून स्त्री-भ्रूण हत्येचे प्रमाण लक्षणीय संख्येने वाढले आहे. एकीकडे “नारी ही दुर्गा है, नारी लक्ष्मी’ सीता, सवित्री है म्हणायचे अन्‌  दूसरीकडे स्त्री जातीचे भ्रूण गर्भातच लिंगनिदान करुन मारायचे, हा अत्यंत गंभीर प्रकार खूप वाढला आहे. हा प्रकार एवढा सहज झाला आहे की, तो जन्मसिद्ध अधिकारच समजला जाऊ लागला! अर्भकाची हत्या हा  गुन्हा आहे ही कायद्याची भितीच नष्ट झाली! एरवी हुंडाबळी, ऑनर किलींगच्या वार्ता आपण रोज वर्तमानपत्रातून वाचतो, परंतु स्त्री- भू्रण हत्या हा प्रकार आई – वडीलांच्या, डॉक्टरांच्या सोयीने  होत असल्यामुळे त्याची वाच्यताही होत नव्हती. आईची इच्छा काय आहे याची चौकशी न करता किंवा प्रसंगी दबाव टाकून हे प्रकार होत असतात. एका स्त्री वर दबाव टाकणारी सासू नावाची दूसरीही स्त्रीच असते. अनैतिक संबंधातून  होणारी भ्रूण हत्या आणि मुलगी नको म्हणून होणाऱ्या हत्या यामध्ये सामाजिक दृष्टीने मोठा फरक आहे. मुलगी नको म्हणून होणाऱ्या हत्येमुळे स्त्रीयांचीच संख्या कमी होत आहे. त्यांचे अनेक दुष्परिणाम समाजाला भोगावे लागणार आहेत.  त्यामुळे  या ज्वलंत प्रश्नांवर राजकारणाच्या बाहेर जाऊन विचार करणे आवश्यक आहे. या जाणीवेतून या प्रश्नावर सामाजिक भान निर्माण करण्यासाठी या विषयावर जनजागृती करायची ठरविली.

  महाराष्ट्रात स्त्री पुरूष संख्येने प्रमाण कसे आहे?
  आपण केवळ ठळक माहितीवर जरी लक्ष केंद्रीत केले तरी या आकडेवरी वरुन गांभीर्य लक्षात येवू शकते. राज्यात सर्वाधिक स्त्रियांची संख्या कमी असणारा जिल्हा म्हणून दुदैवाने बीड जिल्ह्याचे नाव पुढे येते तर स्त्री – पुरूषांचे प्रमाण गडचिरोली या आदिवासी समजल्या जाणाऱ्या जिल्ह्यात सर्वाधिक चांगले आहे. बीड जिल्ह्याची ही डोक्याला झींनझिन्या आणणारी वस्तुस्थिती समाज किती दिवस थंड डोक्यांनी सोसणार आहे हा प्रश्न मला पडत होता. स्त्रियांना कमी लेखने, घरात ठेवणे हे प्रश्न स्त्री – भ्रूण हत्येच्या प्रश्नांसमोर अतिशय शुल्लक वाटतात. त्यामुळे आज जागृत होऊन “मुलगी नको’ या भावनेला विरोध व्हायला हवा. एक हजार पुरूषांमागे सरासरी 992 स्त्रियांची संख्या असावी लागते तिथे ही संख्या 914 वर येवून ठेपली आहे. यापेक्षा सर्वात भयंकर म्हणजे बीड मध्ये ही संख्या 801 वर आली आहे. जिल्ह्याचे सामाजिक चित्र चांगले नाही, असे वाटले म्हणून  त्यामुळे ही जागृती तिथुनच सुरु केली आहे.

  बीड जिल्ह्याची ही स्थिती होण्याची कोणती कारणे आहेत?
  यासाठी माझ्या वैयक्तिक मतानुसार असे वाटते की, याला जिल्ह्याची सामजिक स्थिती कारणीभूत आहे. हुंडा हवा आहे आणि तोही इतरांपेक्षा जास्त, याचा मोठेपणा मिरवता आला पाहिजे. या भावनेतून हूंड्याचे प्रमाण वाढले. हे सर्वसामान्य पालकांच्या आवाक्या बाहेर गेले आहे, त्यातूनच मुलगी नको म्हणजे हुंडा देण्याचे काही काम राहणार नाही अशी भावना तयार झाली. मुलीच्या सरंक्षणाचा प्रश्न पुढे येतो. त्यातूनही सुटका करुन घेण्यासाठी तिचे अस्तित्वच नाकारले जाते. आधुनिक तंत्रज्ञानामुळे लिंग निदान चाचण्या सोप्या झाल्या. त्यामुळेही स्त्री भ्रूण हत्येत वाढ  झाली आहे.

  यावर उपाय कोणता आहे?
  जनजागृती हाच त्यावरचा उपाय आहे. या जोडीला कठोर कायदा असावा यासाठी कायद्यात सुधारणाही सूचविण्यात आल्या आहेत. कायद्याच्या दहशतीमुळेही स्त्री – भू्रण हत्या रोखण्यात यश मिळवू शकते. गर्भलिंग निदान कायदा समितीची मी सदस्या आहे. हा कायदा अधिक कठोर करण्याच्या दृष्टीने आम्ही विचार करित आहोत. एकीकडे स्त्रीला दुर्गा, सावित्री, लक्ष्मी म्हणायचे आणि दुसरीकडे तिचा जन्मच  नाकारायचा. समाजाने हा दुटप्पीपणा, ढोंगीपणा सोडला पाहिजे. स्त्री जातीची गर्भातच हत्या  करणाऱ्या व्यक्तींना समाजाने विचारले पाहिजे की, बाबा  रे तुझी आईच जन्मली नसती,  तर तुझा जन्म झाला असता का? त्यामुळे आता स्त्रियांनी स्त्रियांच्या सुरहक्षितेसाठी पुढे आले पाहिजे.

  या मोहिमेचा राजकारणाशी काही संबंध आहे काय?
  लेक वाचवा – राष्ट्र वाचवा हे संदेश देणारे असे जनजागृती अभियान संपूर्णत: सामाजिक असून राजकारणाशी त्याचा संबंध लावण्यात येऊ नये. एक स्त्री म्हणून माझीही काही जबाबदारी आहे, या एका भावनेतून हे जनजागृती अभियान आम्ही सुरु केलेले आहे. वैद्यनाथ सर्वांगिन विकास संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या या अभियानाची व्याप्ती मराठवाडाभर ठेवली जाणार आहे.

  “माझी कन्या भाग्यश्री’ ही कोणती योजना आहे?
  मराठवाडा विभाग 28 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर 2011 या दरम्यान जन्माला आलेल्या दुसऱ्या क्रमांकाच्या कन्या रत्नाच्या नावाने वैद्यनाथ सर्वांंगिण विकास संस्थेच्या वतीने दीड हजार रूपये ठेवीच्या  रूपाने ठेवण्यात येणार आहेत. या रक्कमेच्या व्याजावर त्या मुलीचे लग्न व्हावे, ज्यामुळे जन्मणाऱ्या मुलीच्या लग्नाची चिंता पालकांना राहणार नाही. थोडक्यात स्त्री-भ्रूण हत्येपासून परावृत्त व्हावे हाच त्यामागे हेतू आहे. यासाठी  दुसऱ्या कन्या रत्नानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करणे गरजेचे राहिल. मराठवाड्यातून जेवढ्या संख्येने नावे येतील त्या सर्वांच्या नावावर ठेवी जमा करण्याचे लक्ष्य आम्ही ठेवले आहे. लेक वाचवा – राष्ट्र वाचवा ही भावना महिलांनीच महिलांसाठी स्वीकारली पाहिजे. आपल्या मुलीच्या नावाने जमा होणारी ही रक्कम त्यांच्या सुरक्षेच्या भावनेला प्रोत्साहन देणारी ठरावी हा त्यामागे उद्देश आहे. तेव्हा या मोहिमेमध्ये आणि जनजागृती अभियानमध्ये सर्व महिलांनी सामाजिकतेचे भान ठेवून सहभागी व्हावे एवढीच अपेक्षा.