Navigation

संघर्ष यात्रा

 

राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांचे जन्मस्थान सिंदखेड राजा ते राणी अहिल्याबाई होळकर यांचे जन्मस्थान चौंडी अशी चौदा दिवसांची 'पुन्हा संघर्ष यात्रा' मी काढणार असून या यात्रेमध्ये राज्यातील लाखो लोकांशी संपर्क साधण्यात येईल. माझे वडील गोपीनाथ मुंडे जी यांनी १९९४ -९५ साली काढलेल्या ऐतिहसिक 'संघर्ष यात्रे' पासून प्रेरणा घेऊन मी हि यात्रा आयोजित केली आहे . गोपीनाथरावांच्या संघर्ष यात्रेनंतर १९९५ साली विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेस पक्षाचा पराभव झाला होता व भाजप - शिवसेना युती राज्यात सत्तेवर आली होती.

माझ्या वडिलांच्या निधनानंतर असंख्य लोकांनी मला भेटून सांत्वन केले व त्यांच्यामुळे मला जगण्यासाठी आशेचा किरण दिसला अशा लाखो लोकांना भेटण्याची संधी मला या यात्रेमुळे मिळेल. माझ्या सांत्वनासाठी आलेल्यांना मी आश्वासन दिले होते कि माझ्या वडिलांप्रमाणे मी सुद्धा माझे जीवन समाजासाठी अर्पण करीन.

छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य व सुराज्य स्थापन करण्यास प्रेरणा देणाऱ्या मातोश्री राष्ट्रमाता जिजाऊ साहेब यांच्या सिंदखेड राजा या जन्मस्थानी 'पुन्हा संघर्ष' यात्रा सुरु होईल. हि यात्रा महाराष्ट्रातील २१ जिल्ह्यामधून ७९ विधानसभा मतदारसंघामध्ये संपर्क साधत पुढे जाईल. चौदा दिवसांच्या यात्रेत सहाशेहून अधिक गावांना भेट दिली जाईल व तीन हजार किलोमीटर पेक्षा अधिक प्रवास होईल. मी अंदाजे ६५ सभा व दोनशे स्वागत मेळाव्यांना संबोधित करणार आहे. भारतामध्ये १६६ वर्षापूर्वी मुलींच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांच्या नायगाव या जन्मस्थानाच्या मार्गे यात्रा जाईल. लाखो गावकर्यांना भेटल्यानंतर सुराज्याचे उदाहरण घालून देणाऱ्या इंदूर संस्थानाच्या महान शासक राणी अहिल्याबाई होळकर यांच्या चौंडी या जन्मस्थानी यात्रेचा समारोप होईल.

पुन्हा संघर्ष यात्रेचा उद्देश मला वंदनीय वाटणाऱ्या महिला समाजसुधारक मार्गाचे अनुसरण करणे आणि गेली १५ वर्षे उपेक्षा अनुभवणाऱ्या ग्रामीण जानाधारामध्ये चैतन्न्य निर्माण करणे हा आहे. माझे वडील गोपीनाथ मुंडेजी यांनी १९९४-९५ साली काढलेली संघर्ष यात्रा आणि मा. वसुंधरा राजे यांनी एप्रिल २०१३ मध्ये काढलेली सुराज्य संघर्ष यात्रा यापासून प्रेरणा घेऊन मी यात्रा आयोजित केली अहे. या दोन्ही उपक्रमाचा ग्रामीण जनाधारावर दीर्घकाळ मोठा परिणाम झाला होता. या यात्रांमुळे मोठे परिवर्तनही झाले होते.

संघर्ष यात्रा व्हीडीओ


संघर्ष यात्रा : दिवस पहिला


संघर्ष यात्रा : दिवस दुसरा


संघर्ष यात्रा : दिवस तिसरा


संघर्ष यात्रा : दिवस चौथा


संघर्ष यात्रा : दिवस पाचवा


संघर्ष यात्रा : दिवस सहावा


संघर्ष यात्रा : दिवस सातवा


संघर्ष यात्रा : दिवस आठवा


संघर्ष यात्रा : दिवस नववा


संघर्ष यात्रा : दिवस दहावा


संघर्ष यात्रा : दिवस अकरावा


संघर्ष यात्रा फोटो

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *