महाराष्ट्र सरकारने आजपर्यंत अनेक कोटी रूपये जलसिंचनासाठी खर्च केले. तरी सुध्दा राज्यातील धरणांच्या आणि जलाशयांच्या परिस्थितीत फारशी सुधारणा झालेली आपणाला दिसत नाही. उलट त्यांची परिस्थिती अजूनच भयावह होताना दिसत आहे. त्यामुळे वैद्यनाथ प्रकल्पासाठी आजपर्यंत सव्वा कोटीहून अधिक खर्च होऊनही हा जलसंधारणाचा सोपा आणि स्वस्त मार्ग असल्याचे नमूद केल्यास वावगे ठरणार नाही. या बंधारे प्रकल्पामुळॆ आजूबाजूच्या गावांना अनेक फायदे होणार आहेत. बंधार्यातील पाणी अडवून साठवल्यामुळे एप्रिल-मे पर्यंत या नाल्यातील पाणी टिकून राहू शकेल. बंधार्यातील साठलेले पावसाचे पाणी जमिनीत मुरल्याने आसपासच्या भागातील विहीरी आणि बोअरवेलला मुबलक आणि चांगले पाणी यायला लागेल. नैसर्गिक पाण्याची पातळी वाढून, गाळ टाकल्यामुळे जमिनीचा कसही वाढेल. परिणामी, आसपास लागवड केला जाणारा ऊस आणि कापूस यांच्या पिकाचा दर्जा सुधारण्यास मदत होईल. ‘पाणी टंचाई’ या भयावह शब्दामुळे निर्माण होणार्या त्रासापासून जनतेची सुटका होण्यास मदत होणार आहे.
आपला देशाची सुजलाम सुफलाम अशी प्रगती व्हायला हवी असेल तर आधी आपले राज्य त्या आधी आपले शहर आणि त्या आधी आपल्या प्रभागाचा सर्वांगिण विकास होणे आवश्यक आहे. समाजातील प्रत्येक घटक अन्न, वस्त्र आणि निवारा या मुलभूत गरजांपासून वंचित राहता कामा नये. पृथ्वीवर जलमय भाग अधिक असूनही महाराष्ट्रात पाऊस पडून सुध्दा पाणी टंचाई ही सर्वात मोठी विकासाच्या आड येणारी गोष्ट आहे हे आपल्या सर्वांना चांगलेच माहिती आहे. आमदार पंकजा मुंडे-पालवे यांनी प्रभाग विकासासाठी ही पाणी टंचाई दूर होणे आवस्यक आहे हे लक्षात घेऊन या प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी त्यांनी आणि त्यांच्या सहकार्यांनी तन, मन आणि धन पणाला लावले आहे. राजकारणात यशस्वी व्हायचे म्हणजे समाजाचा विकास होणे आवश्यक असते.
आमदार पंकजा मुंडे-पालवे यांची जन्मभूमी असलेल्या परळी भागातील समस्या त्या चांगल्या जाणतात. त्यामुळे हा प्रकल्प यशस्वी होण्याकडे त्यांचे लक्ष आहे. आपल्या भागातील समाजाच्या हिताचा नुसता विचार नव्हे तर ते प्रश्न सोडवण्यासाठी आवश्यक ते सर्व आमदार पंकजा मुंडे-पालवे करताना दिसत आहेत. स्त्री-भ्रूण हत्या, लेक वाचवा, गट शेती किंवा हा बंधारे प्रकल्प असो त्या जनतेच्या कायमस्वरूपी सोयींसाठी, विकासासाठी आणि जनतेची वैचारिक प्रगती व्हावी यासाठी ठाम उभ्या आहेत. त्यांनी स्थापन केलेल्या समाजोपयोगी कामे करणार्या एनजीओ संस्थेच्या सदस्यांचे मोठे सहकार्य या भागातील महिलांची प्रगती होण्यासाठी मोलाचे ठरत आहे. महिलांनी केलेल्या उत्तम कामाचे कौतुकही त्या विविध पुरस्कार प्रदान करून करतात. आमदार पंकजा मुंडे-पालवे यांचे युवा नेतृत्त्व पाहून समाजातील अनेक महिला-पुरूषांनी स्वत:हून पुढे येण्याची गरज आहे. यामुळे आपल्या प्रभागातील महिला अत्याचार, शेतीतील अडचणी आणि पाणी टंचाई सारखे प्रश्न सोडवण्यास मदत होईल. दुरदृष्टी आणि आधुनीक तंत्रज्ञानाचा अचूक वापर करून आपल्या जिल्ह्यातील पाणी टंचाई प्रश्न दूर करून समाजाचा कायापालट करण्यार्या म्हणून आमदार पंकजा मुंडे-पालवे यांचे नाव नमुद करणे योग्यच ठरेल....!
Leave a Reply