Gatsheti

Navigation

गटशेती

 

अन्न उपलब्धतेची शाश्वती व ग्रामीण जनतेचे (प्रामुख्याने शेतकऱ्यांचे) राहणीमान सुधारणे याकरिता कृषी क्षेत्राचा विकास होणे महत्त्वाचे आहे. आज मोठे-मोठे उद्योग समूह शेती व्यवसायाकडे वळत आहेत. कार्पोरेट फार्मिंग, कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगसारख्या नवीन कल्पना अस्तित्वात येत आहेत. या कल्पनांच्या आधारावर ‘सहकारी शेती’,‘गट शेती’ प्रत्यक्षात येऊ शकतील.

महाराष्ट्रातील शेती उद्योगामध्ये शासकीय पातळीवर अधिकाधिक आर्थिक गुंतवणूक होणे गरजेचे आहे. शेती क्षेत्राला उद्योगाचा दर्जा, शेती करणाऱ्या व्यक्तीस समाजामध्ये ‘मानाचे स्थान’ प्राप्त होणे गरजेचे आहे. जेणेकरून आजचा सुशिक्षित तरुण वर्गही या उद्योगामध्ये काम करण्यास उद्युक्त होईल. शेती उद्योगाची आव्हाने पेलण्याची मानसिकता आजच्या तरुणांनी दाखवावयास हवी. त्याकरिता सरकारने, समाजाने, बँकांनी, सहकारी संस्थांनी, खाजगी क्षेत्रातील उद्योगांनी, प्रशिक्षण संस्थांनी, राजकीय नेत्यांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन आजच्या तरुण पिढीस सहकार्य व मार्गदर्शन करावयास हवे. तरच आजचा सुशिक्षित तरुण शेती उद्योगाची आव्हाने समर्थरीत्या, यशस्वीपणे पेलू शकेल. आज शेती प्रशिक्षणाच्या व संशोधनाच्या संस्थांना बळकटी देणे आवश्यक आहे. प्रशिक्षणाच्या अभ्यासक्रमातही आजच्या गरजेनुसार आमूलाग्र बदल केले पाहिजेत. व्यवसायाभिमुख कृषी शिक्षण देण्याची आवश्यकता आहे. शेतीच्या बाजारपेठेचे ज्ञान, शेतीपूरक उद्योग, मार्केटिंग (विपणन), पॅकेजिंग, प्रक्रिया उद्योग, साठवणूक उद्योग, शेतीचे व्यवस्थापन व वाणिज्य या विषयीच्या संपूर्ण ज्ञानाचा अभ्यासक्रमात अंतर्भाव असणे आवश्यक आहे. शेती उद्योगाविषयीची असुरक्षिततेची भावना घालवून, शेती उद्योगाची आव्हाने पेलू शकणाऱ्या मानसिकतेला सामर्थ्य देण्यासाठी व आत्मविश्वास प्रबळ होण्याकरिता सर्व संबंधित घटकांनी अधिक प्रयत्न करणे गरजेचे आहे.

गटशेतीबाबत शनिवारी दुपारी अक्षता मंगल कार्यालयात गटशेती करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांची बैठक झाली. या बैठकीला परळी विधानसभा मतदारसंघातील समूह गटशेती करण्यासाठी उत्सुक असलेले शेतकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

सध्या शेतकरी शेतीमालाला भाव मिळत नसल्याने आर्थिक अडचणीत सापडलेला आहे. आर्थिक टंचाईवर मात करण्यासाठी शेतकऱ्यांची सामूहिक शेती (गट शेती) करून प्रगती करावी. आपण पारंपरिक पिके घेत असल्याने त्यांना योग्य भाव मिळत नाही. मात्र बाजारात ज्या पिकांना मागणी आहे अशी पिके घेतली तर शेतकरी आर्थिकदृष्टय़ा स्वावलंबी होऊ शकतो. शेतकऱ्यांनी भाजीपाला शेती आधुनिक पद्धतीने करून वेगवेगळा भाजीपाला व फलोत्पादन करून बाजारपेठ काबीज करावी. या भागातील शेतकऱ्यांनी तयार केलेल्या फळभाजीला हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी व शेतकऱ्यांना गटशेतीसाठी कर्ज मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू.

गटशेतीमार्फत शेतकऱ्यांनी तयार केलेला भाजीपाला पॅकिंग करण्यासाठी महिला बचत गटांना द्यावा त्यामुळे महिला बचत गटही सक्षम होतील असे सांगून आपला माल एक्सपोर्ट दर्जाचा निर्माण करण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न करावेत आणि ही संकल्पना राज्यात आदर्श ठरेल अशा पद्धतीने विकसित करावी. या वेळी नंदूरबार येथील गट शेती तज्ज्ञ वसंत घुले व पुणे येथील बाजारपेठ तज्ज्ञ राजेंद्र ढमाले यांनी शेतकऱ्यांना बाजार पेठ उपलब्ध करून देण्याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. येथे तयार झालेला भाजीपाला हैदराबाद, सुरत, औरंगाबाद अशा त्रिकोणी क्षेत्रात विकला जाणार असून चांगला भाव मिळेल तेथेच माल पुरवठा केला जाईल असे सांगून शेतकऱ्यांनी या उपक्रमात जास्तीतजास्त संख्येनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले.

Photo Gallery

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *